निवडणूक आयोगाबाबतचं जितेंद्र आव्हाडांचं वृत्त चुकीचं आणि तथ्यहीन

निवडणूक आयोगाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवण्याचा कोणताही हेतू नाही. लोकशाही प्रक्रियेतील निवडणूक आयोगासारख्या संस्थांच्या कामकाजावर आमचा पूर्ण विश्वास आहे.

निवडणूक आयोगाबाबतचं जितेंद्र आव्हाडांचं वृत्त चुकीचं आणि तथ्यहीन
| Updated on: Nov 03, 2019 | 8:37 AM

नवी दिल्ली :  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाबाबत केलेल्या ट्विटचं वृत्त टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलं होतं. या बातमीची शहानिशा केल्यानंतर ही बातमी तथ्यहीन आणि चुकीची असल्याचं आढळून आलं. त्यामध्ये तथ्य नसल्याचे आणि चुकीचं असल्याचं आढळले.

या वृत्ताचं खंडण निवडणूक आयोगाने केलं आहे. सोशल मीडियावरील वृत्त म्हणूनच ही बातमी करण्यात आली होती. मात्र त्याची शहानिशा आम्ही केली नव्हती. निवडणूक आयोगाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवण्याचा कोणताही हेतू नाही. लोकशाही प्रक्रियेतील निवडणूक आयोगासारख्या संस्थांच्या कामकाजावर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण तरीही निवडणूक आयोगाबाबत तथ्यहीन वृत्त प्रकाशित झाल्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत.

भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरन यांनीही हे वृत्त पूर्णत: चुकीचं आणि नोंदवलेले आक्षेप तथ्यहीन आहेत असं म्हटलं आहे. याबाबत आम्ही कायदेशीर कारवाईसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत, असंही त्यांनी नमूद केलं आहे.