आरोपांमुळेच सासूचं निधन झालं म्हणणाऱ्या किशोरी पेडणेकर यांना किरीट सोमय्या यांनी असे उत्तर दिले की…

| Updated on: Nov 01, 2022 | 5:47 PM

या SRA प्रकरणात आज किशोरी पेडणेकरांची अडीच तास चौकशी झाली. या चौकशीनंतर सोमय्या यांनी पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांच्यावर टीकेची झोड उठवली.

आरोपांमुळेच सासूचं निधन झालं म्हणणाऱ्या किशोरी पेडणेकर यांना किरीट सोमय्या यांनी असे उत्तर दिले की...
Follow us on

मुंबई : माजी महापौर आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साईनाथ पेडणेकर यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मुंबईच्या दादर पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या SRA प्रकरणात आज किशोरी पेडणेकर यांची तब्बल अडीच तास चौकशी झाली. या चौकशीनंतर सोमय्या यांनी पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांच्यावर टीकेची झोड उठवली.

दादर पोलिसांकडून किशोरी पेडणेकरांची चौकशी सुरु आहे. SRAच्या गाळ्यांमध्ये फसवणूक केल्याचा पेडणेकरांवर आरोप आहे. किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर आज किशोरी पेडणेकरांची चौकशी करण्यात आली.

कर नाही त्याला डर कशाला अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी चौकशीनंतर दिली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटून निवेदन देणार असल्याचे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

किरीट सोमय्यांच्या आरोपांमुळेच माझ्या सासूचं निधन झाले असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी केला होता. घोटाळे करून आता किशोरी पेडणेकरांची नौटंकी सुरू असल्याचे प्रत्युत्तर किरीट सोमय्या यांनी दिले आहे. चौकशी होणार आणि उत्तरही द्यावं लागणार असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकरांवर टीका केली आहे.

पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे वरळी येथील गोमाता जनता एसआरएमधील काही गाळे हडपल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

मुंबईच्या दादर पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या घोटाळ्याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फेत (ईओडब्ल्यू) चौकशी व्हावी अशी मागणी सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.