BREAKING | रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार!, किरिट सोमय्या यांचा दावा, अर्णव गोस्वामी प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

मुंबई: अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि वास्तू सजावटकार अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरिट सोमय्या यांनी केला […]

BREAKING | रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार!, किरिट सोमय्या यांचा दावा, अर्णव गोस्वामी प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 3:47 PM

मुंबई: अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि वास्तू सजावटकार अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरिट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा सवाल किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्याचबरोबर ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. (Kirit Somaiya’s serious allegations against CM Uddhav Thackeray)

किरीट सोमय्या यांचा नेमका आरोप काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांनी वास्तू सजावटकार अन्वय मधूकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक आणि आज्ञा अन्वय नाईक यांच्याकडून रायगड जिल्ह्यातील रेवदंडा जवळच्या किल्ला कोर्लई परिसरात जमीन घेतली. या ठिकाणापासून २ किलोमीटर अंतरावर माझी सासरवाडी आहे. त्यामुळे मला त्या जागेचं महत्व आपल्याला माहिती असल्याचं किरिट सोमय्या म्हणाले.

21 मार्च 2014 रोजी ठाकरे परिवाराकडून नाईक कुटुंबियांना 2 कोटी 20 लाख रुपये याव्यवराहाबाबत देण्यात आहे. हा व्यवहार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी का सांगितला नाही? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? रेवदंडा परिसरात ठाकरे कुटुंबियांनी जमीन घेण्याचं कारण काय? अजून किती जमिनी घेतल्या गेल्या आहेत? असे प्रश्न किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत.

या व्यवहारातील सातबारा हा संयुक्त आहे. नाईक परिवाराचं आपण समजू शकतो, पण ठाकरे आणि वायकर हे दोघांनी मिळून हा व्यवहार का केला? हे दोघे कसे एकत्र आहे? असे प्रश्न विचारतानाच या जमीन व्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणीही किरिट सोमय्या यांनी केली आहे. अर्णव गोस्वामी प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात एवढी तत्परता दाखवण्यामागील कारण समोर यायला हवं, अशी मागणीही सोमय्या यांच्याकडून करण्यात आली आहे.

कुठल्याही प्रकारची चौकशी करा, वायकरांचं भाजपला आव्हान

किरिट सोमय्या यांनी केलेले आरोप घणाघाती नाहीत तर फालतू आहेत. जमिनीचा व्यवहार उघड आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख आहे. त्यामुळे जी चौकशी करायची ती करा, असं थेट आव्हान रविंद्र वायकर यांनी भाजपला दिलं आहे. ठाकरे आणि नाईक यांचा काही संबंध नाही. नाईक यांचा माझ्याशी संबंध आहे, असं स्पष्टीकरणही वायकर यांनी दिलं आहे.

सोमय्या यांच्या आरोपांना उत्तर देताना ठाकरे आणि वायकर एकत्र भागिदारी करु शकत नाहीत का? असा सवाल वायकर यांनी केला आहे. किती जमिनी घेतल्या याची चौकशी करा, असं आव्हान देतानाच सगळ्या जमिनींची नोंद असल्याचा दावा वायकर यांनी केला आहे. अर्वण प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपचं हे नाटक सुरु असल्याची टीका वायकर यांनी केली आहे.

संबंधित बातम्या:

BREAKING | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा गृहमंत्री अनिल देशमुखांना फोन, अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त

अंतरिम जामीन नाही; अर्णव गोस्वामींची आता सर्वोच्च न्यायालयात धाव

Kirit Somaiya’s serious allegations against CM Uddhav Thackeray

Non Stop LIVE Update
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.