Kishori Pednekar : उद्धव ठाकरे यांचं काम जनता विसरणार नाही; किंमत मोजावी लागेल, पेडणेकरांचा एकनाथ शिंदेंना इशारा

| Updated on: Jul 31, 2022 | 12:28 PM

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी सध्या शिवसेनेत सुरू असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. घराचे वासे फीरले की घर फीरतं असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.

Kishori Pednekar : उद्धव ठाकरे यांचं काम जनता विसरणार नाही; किंमत मोजावी लागेल, पेडणेकरांचा एकनाथ शिंदेंना इशारा
किशोरी पेडणेकर
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी सध्या शिवसेनेत (Shvsena) सुरू असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. घराचे वासे फीरले की घर फीरतं असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. भीतीपोटी हे बंड झाले आहे, याला शिवसैनिकच उत्तर देतील. काही काळानंतर या बंडाला निश्चितच उत्तर मिळेल असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. चंद्रकातं पाटील त्यादिवशी बोलले काळजावर दगड ठेवून मुख्यमंत्री बनवलं, आता त्यांनाही कळेल कुठले दगड ठेवले असे म्हणत किशोरी पेडणेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच यावेळी पेडणेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौतुक देखील केले आहे.

नेमकं काय म्हणाल्या पेडणेकर

किशोरी पेडणेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. घराचे वाशे फिरले की घरही फिरते. हे बंड भितीपोटी झाले आहे. चंद्रकांत पाटील त्याच दिवशी म्हटले काळजावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं,  आता त्यांनाही कळेल कुठले दगड ठेवले. या सर्वांची किंमत मोजवी लागेल, योग्यवेळी शिवसैनिकच या बंडाला उत्तर देतील असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं देखील कौतुक केले आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं ते जनता विसरणार नाही, त्यामुळे येत्या काळात बंडखोरांना नागरिकांच्या त्रासाची किंमत मोजावी लागले असा इशाराही पेडणेकर यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

केंद्राने भूमिका स्पष्ट करावी

दरम्यान यावेळी त्यांनी गणेशाच्या मूर्तीची उंची  मर्यादा यावर उठवलेली बंदी यावर देखील प्रक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी सरकारकडू मूर्तीच्या उंचीवर मर्यादा घालण्यात आली होती. मात्र नवे सरकार सत्तेत येताच मूर्तीच्या उंचीवरील मर्यादा उठवण्यात आली आहे. यावर बोलताना पेडणेकर म्हणाल्या की,  मूर्तीची उंची किती असावी याबाबत केंद्र सरकारने भूमिका मांडली पाहिजे, केंद्राने त्यावेळी मूर्तीच्या उंचीबाबत नोटीस बजावली होती.