कोल्हापुरातील भाजपचा बडा नेता सतेज पाटलांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये

| Updated on: Mar 01, 2021 | 8:59 AM

चंदगड तालुक्यातील भाजपवासी झालेल्या गोपाळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसचा झेंडा हाती धरला. (Kolhapur BJP Gopalrao Patil Congress)

कोल्हापुरातील भाजपचा बडा नेता सतेज पाटलांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये
गोपाळराव पाटील यांचा भाजपला अलविदा, काँग्रेसमध्ये प्रवेश
Follow us on

कोल्हापूर : कोल्हापुरातील भाजपच्या बडा नेत्याने काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज पाटील (Satej Patil) यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गोपाळराव पाटील (Gopalrao Patil) यांनी अवघ्या तीन वर्षात भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये घरवापसी केली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पुनरागमनाच्या चर्चा रंगल्या होत्या. (Kolhapur BJP Leader Gopalrao Patil joins Congress again)

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच गळती

कोल्हापूरमध्ये भाजपला गळती सुरुच असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या जिल्ह्यातच गळतीला सुरुवात झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. चंदगड तालुक्यातील भाजपवासी झालेल्या गोपाळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसचा झेंडा हाती धरला.

चंद्रकांत पाटलांनी शब्द न पाळल्याचा आरोप

तीन वर्षांपूर्वी गोपाळराव पाटील यांनी काँग्रेसला अलविदा करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु वरिष्ठ नेत्यांनी पक्ष प्रवेशाच्या वेळी दिलेला शब्द पाळला नसल्याची नाराजी गोपाळरावांनी व्यक्त केली होती. ते गेल्या दिवसांपासून नाराज होते.

कोण आहेत गोपाळराव पाटील?

गोपाळराव पाटील यांचे चंदगडमध्ये मोठे राजकीय प्रस्थ आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट देण्यात येईल असे, असे भाजपने आश्वासन दिल्याचा दावा गोपाळराव यांनी केला. मात्र, ऐनवेळी भाजपने शिवाजी पाटील यांना तिकीट देऊन गोपाळराव यांना डावलल्याचंही त्यांच्या समर्थकांकडून सांगितलं जात आहे. (Kolhapur BJP Leader Gopalrao Patil joins Congress again)

भाजपात योग्य सन्मान होत नसल्याचीही खंत

पक्षप्रवेशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोपही गोपाळराव समर्थकांकडून होत आहे. तसेच भाजपमध्ये योग्य सन्मानही मिळत नसल्याने पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे.

अखेर कोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

भाजपला आणखी एक झटका?, पुण्यातील माजी आमदार राष्ट्रवादीत जाणार; अजितदादांशी खलबतं!

नवी मुंबईत भाजपला धक्का, राजीनामा दिलेले 4 नगरसेवक शिवसेनेत जाणार

(Kolhapur BJP Leader Gopalrao Patil joins Congress again)