चंद्रकांतदादांनी शब्द न पाळल्याचा आरोप, कोल्हापुरातील भाजप नेता काँग्रेसप्रवेशाच्या तयारीत

पक्षप्रवेशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शब्द न पाळल्याचा गोपाळरावांनी आरोप केला आहे. (Kolhapur BJP Gopalrao Patil congress)

  • भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर
  • Published On - 9:36 AM, 28 Jan 2021
चंद्रकांतदादांनी शब्द न पाळल्याचा आरोप, कोल्हापुरातील भाजप नेता काँग्रेसप्रवेशाच्या तयारीत
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीवेळी मोठी इनकमिंग झालेल्या भाजपला आता गळतीस सुरुवात झाली आहे. भाजमधील बडे नेते जाहीरपणे नाराजी व्यक्त करत पक्षाला रामराम ठोकण्याची भाषा करत आहेत. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य असलेले गोपाळराव पाटील (Gopalrao Patil) हेसुद्धा भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. पक्षप्रवेशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शब्द न पाळल्याचा गोपाळरावांनी आरोप केला आहे. ते भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची असल्याची वर्तविली जात आहे. (Kolhapur BJP leader Gopalrao Patil is going to resign will join the congress)

चंद्रकांत पाटलांनी शब्द पाळला नाही

गोपाळराव पाटलांचे चंदगड येथे मोठे राजकीय प्रस्थ आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना तिकीट देण्यात येईल असे, असे भाजपने आश्वसान दिल्याचा दावा गोपाळराव यांनी केलाय. मात्र, ऐनवेळी भाजपने शिवाजी पाटील यांना तिकीट देऊन गोपाळराव यांना डावलण्यात आल्याचंही त्यांच्या समर्थकांकडून म्हटलं जात आहे. त्यामुळे पक्षप्रवेशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शब्द पाळला नसल्याचा आरोपही गोपाळराव समर्थकांकडून होत आहे. तसेच, भाजपमध्ये योग्य सन्मानही मिळत नसल्याने पाटील यांच्यासह  त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. या सर्व कारणांमुळे गोपाळराव पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पुण्यात बापू पठारे राष्ट्रवादीच्या वाटेवर

सत्तेपासून दूर असल्यामळे सध्या भाजपच्या अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. भाजपमध्ये योग्य सन्मान मिळत नसल्याचं नाराज नेत्यांकडून म्हटलं जात आहे. पुण्यात एकीकडे भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारे हेसुद्धा (Bapu Pathare) राष्ट्रवादीत प्रवेश करुन घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी पठारे यांनी पक्षप्रवेशाबाबत खलबतं केल्याचं सांगण्यात येत होतं.

गोपाळराव पाटील

मात्र, पठारे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा झाल्यानंतर त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मी अजित पवार यांनी भेटलेलो नाही. माझी आणि त्यांची कोणतीही चर्चा झाली नाही. माझ्या विरोधी लोकांकडून मुद्दामहून अशा चर्चा पसरवल्या जात आहेत,” असं स्पष्टीकरण बापू पठारे यांनी 23 जानेवारी रोजी दिलं होतं.

दरम्यान, गोपाळराव पाटील, बापू पठारे अशा नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेआधी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक स्थानिक नेते कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर बापू पठारे, गोपाळराव पाटील यांच्यासारखे नेतेमंडळी नाराज असल्याच्या चर्चा राजकीय गोटात सुरु आहेत.

संबंंधित बातम्या :

राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेवर बापू पठारे काय म्हणाले?, वाचा पहिली प्रतिक्रिया

भाजपला आणखी एक झटका?, पुण्यातील माजी आमदार राष्ट्रवादीत जाणार; अजितदादांशी खलबतं!

(Kolhapur BJP leader Gopalrao Patil is going to resign will join the congress)