पूरग्रस्तांच्या प्रश्नावरुन राजू शेट्टी आक्रमक, 22 ऑगस्टला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

| Updated on: Aug 13, 2021 | 6:38 PM

राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली असली तरी अद्याप ती पोहोचली नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. 23 ऑगस्टला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलीय.

पूरग्रस्तांच्या प्रश्नावरुन राजू शेट्टी आक्रमक, 22 ऑगस्टला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना
Follow us on

कोल्हापूर : मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे राज्यातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालं आहे. पंचगंगा आणि कृष्णा नद्यांनी धोका पातळी ओलांडल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा फटका बसलाय. दरम्यान, राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली असली तरी अद्याप ती पोहोचली नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. 23 ऑगस्टला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलीय. (Raju Shetty is aggressive on issue of flood affected citizens)

संपूर्ण पीक कर्जमाफीसह पूर पट्ट्यातील घरांचं विना अट संपूर्ण पुनर्वसन करण्याची प्रमुख मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केलीय. त्यामुळे 23 ऑगस्टपर्यंत सरकारनं नुकसान भरपाईचं धोरण ठरवावं, अन्यथा पुढचा निर्णय मोर्चावेळी जाहीर करु, असा इशाराही राजू शेट्टी यांनी सरकारला दिलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार फक्त आश्वासनं देऊन गेले. ज्यांना शेती कळत नाही त्यांनी मदत केली. मात्र, ज्यांना ती कळते त्यांनी मदत द्यायला टाळाटाळ केली, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

मी मदत करणारा मुख्यमंत्री- उद्धव ठाकरे

महापुरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात येत पूरस्थितीची पाहणी केली होती. त्यावेळी मी यापूर्वीही सांगितलं आहे की मी सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. पण सगळ्या पूरग्रस्तांना नक्की मदत करेन. आपण पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नसल्याचं म्हणत मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

सरकारकडून मदतीची घोषणा

दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. त्यावेळी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी नुकसानीचं सादरीकरणही करण्यात आलं. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महत्त्वाचे निर्णय

>> पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी 10 हजार रुपये देणार
>> पूर्ण घर पडलं असेल तर दीड लाखाची मदत
>> अर्ध घर पडलं असेल तर 50 हजाराची मदत
>> दुकानदारांना 50 हजाराची मदत देणार
>> टपरीधारकांना 10 हजार रुपये देणार
>> उद्यापासूनच मदत देण्यास सुरुवात होणार
>> कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नांदेड, परभणीसह संपूर्ण राज्यातील पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींचं पॅकेज जाहीर
>> एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक मदत
>> 4 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान
>> 4 हजार 500 जनावरांच्या मृत्यूची नुकसान भरपाई देणार
>> जनावरांच्या मृत्यूंची 7 कोटींची भरपाई देणार
>> 3 दिवसात पंचनामे पूर्ण होणार

इतर बातम्या :

भाजप आमदाराकडून पहिल्यांदाच MIM च्या खासदाराचं कौतुक, महाराष्ट्रात चर्चेचा विषय

उच्च न्यायालयाने सूचित केल्यानंतर तरी राज्यपाल 12 आमदारांची नियुक्ती करतील, राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार टोला

Raju Shetty is aggressive on issue of flood affected citizens