Kolhapur North Assembly : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत पैशांचा पाऊस? पोलिसांना किती पाकीटं सापडली?

| Updated on: Apr 11, 2022 | 6:55 PM

कोल्हापूर उत्तर विधानसभा मंतदार संघाचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच आता निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होत असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात पैशाची पाकीटं सापडल्याचे समोर आले आहे.

Kolhapur North Assembly : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत पैशांचा पाऊस? पोलिसांना किती पाकीटं सापडली?
भाजप कार्यकर्त्यांकडे पैसे सापडले
Image Credit source: tv9
Follow us on

कोल्हापूर  : कोल्हापूर उत्तर विधानसभा मंतदार संघाचा (Kolhapur North Assembly Election) प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच आता निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होत असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. भाजपाच्या (BJP) माजी नगरसेविकेच्या कार्यालयात पैशाची पाकीटं सापडल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी पोलिसांनी (Kolhapur Police) भाजपाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. उद्या होणार्‍या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटप करत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांवर आहे. यात चौकशी सुरू आहे, अद्यापही गुन्हा दाखल नाही. अशी माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सामना कोल्हापुरात रंगला आहे. उद्या या जागेसाठी मतदान होणार आहे. अशात हे प्रकरण समोर आल्याने खळबळ माजली आहे. पोलीस तपासात काय माहिती समोर येते हेही पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

मतदानाला उरले अवघे काही तास

या मतदारसंघता सध्या जोरदार घमासान सुरू आहे. भाजपकडून या ठिकाणी सत्यजीत कदम यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव या जागेसाठी निवडणूक लढवत आहेत. जयश्री जाधव या दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आगाडी पूर्ण जोर लावत आहे. अनेक बडे नेते सध्या कोल्हापुरात ठाण मांडून बसले आहेत. विशेष करुन काँग्रेस नेते सतेज पाटील यांची या ठिकाणी प्रतीष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे सतेज पाटील ही जागा पुन्हा काँग्रेसच्या गोटात आणण्यासाठी चारी बाजुने फिल्डिंग लावत आहेत.

एवढे पैसे कशासाठी?

मतदानाला थोडा अवधी उरल्याने सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी मोठा जोर लावत असतात. मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने आकर्षित करताना दिसून येतात. मात्र निवडणुकीत पैशांचे वाटप करणे बेकायदेशीर असल्याने अनेकदा या राजकीय पक्षांची अडचण होते. आता पोलिसांना हा पैसा सापडल्याने हे पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणले होते की दुसऱ्या कोणत्या कारणासाठी हे तर चौकशीनंतरचर स्पष्ट होईल. मात्र सध्या या प्रकरणाची कोल्हापुरात जोरदार चर्चा आहे. यावरून जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत. त्यामुळे प्रकरण आता काय वळण घेतं हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Gunratna Sadavarte : 1 कोटी 80 लाख रुपये कुठे गेले? सदावर्तेंनी एवढा पैसा का गोळा केला? कोर्टात घमासान

Amruta fadnavis : महाविकास आघाडी सर्वात भ्रष्ट सरकार, अमृता फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

OBC Reservation : ओबीसी आरक्षणावरुन राज्य विरुद्ध केंद्र, बावनकुळेंची राज्य सरकारवर टीका, भुजबळांची केंद्रावर टीका