खा. कोल्हेंनी खेडमध्ये जनसंपर्क कार्यालय काढलं पण ते भेटणार का? शरद पवारांनी ‘तार्तम्य’ सांगितलं, आ. मोहितेंनाही धक्का?

डॉ. कोल्हे यांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, मतदारांशी संपर्क साधण्यासाठी येथे जनसंपर्क कार्यालय सुरु केले., याच आनंद आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा खासदार रोज इथे बसणार नाहीत. त्यांना दिल्लीला बसावं लागत सहा महिने तिथे थांबावे लागते. नाही तर उद्या लोक खासदार कोल्हे कार्यालय खोलल मात्र खासदार इथं दिसत नाहीत.

खा. कोल्हेंनी खेडमध्ये जनसंपर्क कार्यालय काढलं पण ते भेटणार का? शरद पवारांनी तार्तम्य सांगितलं, आ. मोहितेंनाही धक्का?
Sharad Pawar
| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 4:07 PM

पुणे- लोकसभेच्या मागच्या निवडणुकीमध्ये ज्यांना आपण निवडून दिले. ते अमोल कोल्हे गेली काही महिने मी संसदेची माहिती घेतो, त्यावेळी या तालुक्याचेच नव्हे तर जिल्ह्याचे महाराष्ट्राचे अनेक महत्त्वाचे प्रश्न लोकसभेत मांडण्याचे काम डॉ. अमोल कोल्हे (MP Amol kolhe)  करतात. खूप वेळेला मतदार संघात आपला प्रतिनिधी दिल्लीत काय करतो, याची माहिती नसते. खासदार झाल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा जास्त असतात. मात्र खासदाराकडून , आमदाराकडून , अगदी पंचायत संमिती, ग्रामपंचायत सदस्यांकडून कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात याच तारतम्य बाळगण्याची अपेक्षा असते, असे म्हणत शरद पवारांनी(Sharad Pawar) खासदार कोल्हेची बाजू घेत आमदार दिलीप मोहिते(MLA Dilip Mohite) यांनी घेतलेल्या आक्षेपांना उडवून लावले.

तुमच जे काही दुखणं असेल ते इथे लेखी द्या

मतदार संघातील प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधीनी योग्यती व्यवस्था करून ठेवणे गरजेचे आहे. ज्यामुळे नागरिकांना अडचण येणार नाही. आज डॉ. कोल्हे यांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच मतदारांशी संपर्क साधण्यासाठी येथे जनसंपर्क कार्यालय सुरु केले याच आनंद आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा खासदार रोज इथे बसणार नाहीत. त्यांना दिल्लीला बसावं लागत सहा महिने तिथे थांबावे लागते. नाही तर उद्या लोक खासदार कोल्हे कार्यालय खोलल मात्र खासदार इथं दिसत नाहीत. कृपा करून हे डोक्यातून काढा. तुमच जे काही दुखणं असेल ते इथे लेखी द्या. पक्षाचे नेते त्याचा पाठ पुरावा करतील व ते सोडवतील, असा खोचक सल्ला ही त्यांनी दिली. खेड येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उभारलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते .

काय होता आ. दिलीप मोहितेंचा खोचक सल्ला
आमदार दिलीप मोहितेंनी ‘डॉ. अमोल कोल्हे खेड तालुक्यातील कोणताही निर्णय घेताना आपल्याला विचारात घेत नाहीत. तालुक्यात परस्पर येऊन कार्यक्रम करतात आणि ज्यांनी निवडणूकीत जीवाचं रान करून निवडून आणले त्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या विरोधकांना बरोबर घेतात, हे बरं नाही. समाजकारण यु ट्यूब, फेसबुकवर पोस्ट टाकण्याऐवढे सोपे नाही. असा चिमटा काढत ज्यांनी तुम्हाला योग्य समजून मते दिली त्या लोकांचे काम करा आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत या” असा थेट बोचरा सल्ला कार्यकर्ता मेळाव्यात दिला होता.

वडीलकीचा सल्ला मनाला, कोल्हेचे उत्तर

दिलीप आण्णानी वडीलकीच्या नात्यानं सल्ला दिला होता, की केवळ समाज माध्यमातून नाही तर थेट संपर्क असायला हवा असा सल्ला दिला होता. त्यांच्या सल्ला शिरोधार्य मानून या यापद्धतीने तालुक्यात जनसंपर्क वाढला जावा. सर्वसामान्यांना हक्काच जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आलंच डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

आमदार दिलीप मोहिते यांच्या बोलण्याला कोल्हे यांनी थेट त्यांच्याच तालुक्यात जनसंपर्क कार्यालय उघडून कृतीतून उत्तर दिले आहे. इतकच नव्हे तर पक्ष नेतृत्वानेही कोल्हेंचे कौतुक करत पाठ थोपटली आहे. यामुळे येत्या काळात खेड तालुक्यातील राजकारणात पुन्हा एकदा अंतर्गत राजकीय कलह सुरु झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Income Tax Raid: कोणत्या संपत्तीवर होऊ शकते कारवाई? कुणावर पडते धाड? आयटी छापेमारीविषयी वाचा सविस्तर

Nagpur Corona | भीती कोरोनाची, आरोग्य सुविधांचा अभाव; मनपाने नेमके काय केले?

Omicron | नाशिककरांच्या काळजाचा ठोका चुकला, कोरोनाचे रुग्ण 482 वर, जुन्या आठवणी ताज्या…