Omicron | नाशिककरांच्या काळजाचा ठोका चुकला, कोरोनाचे रुग्ण 482 वर, जुन्या आठवणी ताज्या…

नाशिकमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 8 हजार 748 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात आता ओमिक्रॉनची भीती व्यक्त होतेय. त्यामुळे नाशिकरांच्या दुःखद आठवणींची खपली पुन्हा एकदा निघाली आहे.

Omicron | नाशिककरांच्या काळजाचा ठोका चुकला, कोरोनाचे रुग्ण 482 वर, जुन्या आठवणी ताज्या...
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 3:48 PM

नाशिकः नाशिकमध्ये कोरोनाच्या 482 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 251 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 12 ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 748 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

यांच्यावर उपचार सुरू

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 28, बागलाण 16, चांदवड 08, देवळा 09, दिंडोरी 18, इगतपुरी 32, कळवण 04, मालेगाव 05, नांदगाव 08, निफाड 55, पेठ 02, सिन्नर 18, सुरगाणा 10, त्र्यंबकेश्वर 01, येवला 03 असे एकूण 217 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 255, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 05 तर जिल्ह्याबाहेरील 05 रुग्ण असून असे एकूण 482 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 13 हजार481 रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन विषाणूमुळे जगभरात धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातही सार्वजनिक ठिकाणच्या वावरासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. लस नसेल, तर कुठेही प्रवेश मिळणार नाही. विनालसीकरण लोक आढळले, तर संबंधित आस्थापनांना जबाबदार धरले जाईल, या नियमांची गुरुवारपासून अंमलबजावणी करण्यात येत आहे.

24 तास लसीकरण

नाशिक जिल्ह्यातील मालेगावसह येवला, बागलाण, सुरगाणा आणि नांदगाव या चार तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने या भागात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठीच महापालिच्या वतीने नाशिकमध्ये चार ठिकाणी चोवीस तास लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यात नवीन बिटको, डॉ. झाकीर हुसैन रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय आणि मोरवाडी येथील रुग्णालयात चोवीस तास लसीकरण सुरू राहणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात ओमिक्रॉनचे रुग्ण देशात वाढू शकतात, अशी भीती तज्ज्ञांनकडून व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

दुःख आठवणी ताज्या…

नाशिकमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 8 हजार 748 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात आता ओमिक्रॉनची भीती व्यक्त होतेय. प्रशासन दक्ष आहे. मात्र, नवे निर्बंध आणि सूचनांमुळे नाशिकरांच्या दुःखद आठवणींची खपली पुन्हा एकदा निघाली आहे. येणाऱ्या काळात पुन्हा रुग्ण वाढणार का, अशी भीतीही व्यक्त होत आहे.

इतर बातम्याः

TDR scam | नाशिक महापालिकेतला 100 कोटींचा टीडीआर घोटाळा विधिमंडळात गाजला; महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

नाशिकमध्ये परवानगीविनाच भिर्रर्र…आयोजक सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार, कोरोनाचे नियम पायदळी

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.