राहुल गांधी यांची सर्वात मोठी घोषणा, ‘4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार बनणार, 30 लाख तरुणांना…’

"देशाच्या तरुणांनो, 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार बनायला जात आहे. आम्हाला गॅरंटी आहे, 15 ऑगस्टपर्यंत 30 लाख रिक्त सरकारी पदांच्या भरतीचं काम आम्ही सुरु करुन टाकू", असा मोठा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी यांची सर्वात मोठी घोषणा, '4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार बनणार, 30 लाख तरुणांना...'
काँग्रेस नेते राहुल गांधी
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 6:29 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज ‘एक्स’वर व्हिडीओ ट्विट केलाय. या व्हिडीओसोबत त्यांनी देशाच्या लाखो तरुणांना उद्देशून महत्त्वाचा मेसेजही लिहिला आहे. देशात आता सत्ता परिवर्तन होणार, अशी खात्री राहुल गांधी यांना आहे. देशात पुढच्या काही दिवसांमध्ये इंडिया आघाडीचं सरकार येईल, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केलाय. विशेष म्हणजे इंडिया आघाडीचं सरकार येताच तरुणांना सरकारी नोकरी देण्यासाठी कोणती योजना सुरु केली जाईल? याबाबतची घोषणा देखील राहुल गांधी यांनी केली आहे.

“देशाच्या तरुणांनो, 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार बनायला जात आहे. आम्हाला गॅरंटी आहे, 15 ऑगस्टपर्यंत 30 लाख रिक्त सरकारी पदांच्या भरतीचं काम आम्ही सुरु करुन टाकू. नरेंद्र मोदी यांच्या खोट्या प्रचारामुळे भरकटून जाऊ नका. आपल्या मुद्द्यांवर कायम राहा. इंडियाचं ऐका. द्वेष नाही तर नोकरी निवडा”, असं राहुल गांधी ‘एक्स’वर म्हणाले आहेत.

‘मोदींच्या हातून निवडणूक निसटली’, राहुल गांधींचा दावा

“देशाची शक्ती, देशाच्या तरुणांनो, नरेंद्र मोदी यांच्या हातून आता निवडणूक निसटत चालली आहे. ते आता हिंदुस्तानचे पंतप्रधान बनणार नाहीत. त्यांनी निर्णय घेतला आहे की, पुढच्या चार-पाच दिवसांत तुमचं लक्ष विचलित करायचं आहे. काही ना काही ड्रामा करायचा आहे. तुमचं लक्ष दुसरीकडे भरकटायला नको. बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.

“नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला सांगितलं होतं की, 2 कोटी तरुणांना रोजगार देणार. पण ते खोटे म्हणाले. नोटबंदी केली, चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावली. मोदी सरकारने सर्वचे सर्व काम उद्योगपती अदानी सारख्या लोकांसाठी केलं आहे. आम्ही भरती भरोसा स्किम आणत आहोत. देशात 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार येत आहे. 15 ऑगस्टपर्यंत भरती भरोसा स्किमच्या अंतर्गत 30 लाख तरुणांना रोजगार देण्याचं काम सुरु होईल”, असं राहुल गांधी म्हणाले.

Non Stop LIVE Update
राऊतांचे बंधू सुनील मतदानकेंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमकं काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदानकेंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमकं काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा.
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.