मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेव्हणे Shridhar Patanakar यांना ED चा मोठा दणका! ठाण्यातील 11 फ्लॅट्स जप्त

| Updated on: Mar 22, 2022 | 7:44 PM

ED Raid Shridhar Patankar Brother Of Rashmi Thackeray Today : आता मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याला ईडीने मोठा दणका दिला आहे, ठाण्यातल्या 11 सदनिका सील करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेव्हणे Shridhar Patanakar यांना ED चा मोठा दणका! ठाण्यातील 11 फ्लॅट्स जप्त
मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याला दणका
Image Credit source: tv9
Follow us on

ठाणे : आज सकाळपासून ईडीचे धाडसत्र (ED raid)  सुरू आहे. यात मोठ्या कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि झालही तेच आहे. कारण आता मुख्यमंत्र्यांच्या (Cm uddhav thackeray) मेहुण्याला ईडीने मोठा दणका दिला आहे, ठाण्यातल्या 11 सदनिका सील करण्यात आल्या आहेत. श्रीधर पाटणकर असे मुख्यमंत्र्यांच्या महुण्याचं नाव आहे, (Shridhar patankar) ज्यांची ठाण्यातली संपत्ती ED ने जप्त केलीय. यात जवळपास 6.45 कोटींच्या सपत्तीला टाळा लावण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आलंय. महाराष्ट्रात सध्या ईडी अॅक्टिव्ह मोडवर आहे. पुष्पक बिलीयन फसवणूक प्रकरणात ईडीने हा मोठा दणका दिला आहे. यात ईडीने आधीही कोट्यवधी रुपयांची माहिती सोर आली आहे. यात ईडीने आधीच मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार हा तपास सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडीचे धाडसत्र सुरू आहे. यात अनेक मोठ्या कारवाई करण्यात आल्या आहेत.

ईडीचे ट्विट

ईडीने काय माहिती दिली?

यापूर्वी संचालनालयाने 06.03.2017 रोजी, PMLA, 2002 च्या तरतुदींनुसार, पुष्पक बुलियन आणि समूह कंपन्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केली होती आणि आधीच पुष्पक बुलियनची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. 21.46 कोटी किंमतीच्या महेश पटेल, चंद्रकांत पटेल, त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्याद्वारे नियंत्रित कंपन्या आहेत. त्यानंतरच्या तपासात असे दिसून आले की महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या संगनमताने पुष्पक ग्रुपच्या मेसर्स पुष्पक रियल्टीचा निधी चोरून नेला होता. मेसर्स पुष्पक रियल्टी डेव्हलपरने विक्रीच्या नावाखाली 20.02 कोटी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांना विविध जोडलेल्या/अनकनेक्ट केलेल्या संस्थांद्वारे चोरल्याचे ईडीकडून सांगण्यात आलंय.  अनेक शेल कंपन्या चालवणारे नंदकिशोर चतुर्वेदी यांनी त्यांच्या शेल कंपनी मेसर्स हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेड मार्फत जास्त असुरक्षित कर्ज देण्याच्या नावाखाली पैसे हस्तांतरित केले. मेसर्स श्री साईबाबा गृहनिर्मिरी प्रा.ला 30 कोटी महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या संगनमताने काढून घेतलेले, असेही ईडीकडून सांगण्यात आलं आहे.

 

भाजप महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप

राज्यात ईडी सुडाने कारवाई करत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून सतत महाविकास आघाडीकडून करण्यात यतोय. तर या कारवाईत केंद्रचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारमधील अनेक मंत्री ईडीच्या राडारावर आहेत. तसेच नवाब मलिक आणि अनिल देशमुख तर जेलवारीत गेलेत. त्यामुळे या कारवाईने हा संघर्ष आणखी वाढणार हे स्पष्ट झालं आहे.

‘राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांच्या स्वभावाचा फायदा घेतेय’, मावळमधून पार्थ पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेनंतर बारणे आक्रमक

आम्ही काही युतीचा प्रस्ताव दिला नाही, राऊत काय म्हणतात त्याला महत्त्व नाही; chandrakant patil यांचे रोखठोक विधान

Uttar Pradesh : 24 तासांत तीन बड्या नेत्यांचे राजीनामे, योगी आदित्यनाथ, अखिलेश यादवांचाही राजीनामा, काय आहे राजीनाम्यामागचं कारण?