“प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आल्यास शिवशाहीला नव्हे, पेशवाईला फटका”

| Updated on: Jun 12, 2021 | 12:51 PM

येत्या निवडणुकीत वंचित आघाडी (Vanchit Aaghadi) आणि संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) एकत्र आल्यास त्याचा फटका पेशवाईला बसेल, शिवशाहीला नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आल्यास शिवशाहीला नव्हे, पेशवाईला फटका
खासदार संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर
Follow us on

अमरावती : येत्या निवडणुकीत वंचित आघाडी (Vanchit Aaghadi) आणि संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) एकत्र आल्यास त्याचा फटका पेशवाईला बसेल, शिवशाहीला नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. ते अमरावतीत बोलत होते. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि कोरोना रुग्णालयांना (Corona) भेट देण्यासाठी नाना पटोले सध्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.

नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली असून, नक्षलवादी हे लोकतांत्रिक पद्धतीचा विरोध करतात, त्यामुळे त्यावर बोलणे योग्य नाही असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.

शिवशाहीला नव्हे पेशवाईला धक्का बसेल 

नाना पटोले यांच्याकडून प्रकाश आंबेडकर यांच्याशी आघाडी करण्याचे संकेत आहेत. त्या अनुषंगाने पटोले यांना विचारण्यात आलं, त्यावर नाना पटोले म्हणाले, “संभाजीराजे छत्रपती आणि वंचित आघाडी एकत्र आले तर त्याचा फटका शिवशाहीला नव्हे तर पेशवाईला बसेल”

केंद्राकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ 

कोरोनानंतर उद्भवणार्‍या आजारावर केंद्र सरकारकडे इंजेक्शन उपलब्ध असतानाही ते राज्याला देत नाही. आज राज्यात 50 हजार पोस्ट कोव्हिडचे रुग्ण असताना, केवळ चार ते पाच हजार इंजेक्शन देतात. बाहेर या इंजेक्शनचा काळा बाजारा केला जातो. यामुळे अनेकांना आपले जीव तर काहींना आपले अवयव गमवावे लागले आहेत. मात्र केंद्र सरकारला सामान्य माणसाशी काहीही घेणे देणे नाही. ते सामान्य माणसाच्या जीवाशी खेळत आहेत, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली.

प्रकाश आंबेडकरांना आघाडीत घेण्याचे प्रयत्न 

दरम्यान, नाना पटोले यांनी काल अकोल्यात बोलताना, प्रकाश आंबेडकरांना आघाडीत घेण्याचे संकेत दिले होते. . 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे, असं पटोले म्हणाले. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आघाडीच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं. आंबेडकर आणि काही छोट्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करण्यात येईल. मात्र, अद्याप कुणाशीही चर्चा सुरू झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या  

Maratha Reservation | राजे शिळेपणा घालवा, पुढाकार घ्या; प्रकाश आंबेडकरांची संभाजीराजेंना साथ

शाहू महाराज-बाबासाहेब एकत्र येऊ शकतात, मग प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे का नाही? : छत्रपती संभाजीराजे

प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार; नाना पटोलेंचं मोठं विधान

VIDEO: विधानसभा, लोकसभाही महाविकास आघाडी एकत्रित लढणार?; शरद पवारांचं मोठं विधान, वाचा सविस्तर

(Maharashtra congress president Nana Patole said, if Prakash Ambedkar and Sambhaji  Chhatrapati come with us then blow will fall on Peshwai, not Shivshahi )