मोठी बातमी: नाना पटोलेंनी घेतली राहुल गांधींची भेट; प्रदेशाध्यक्ष निवडीच्या हालचाली अंतिम टप्प्यात

| Updated on: Feb 03, 2021 | 9:15 PM

या भेटीनंतर नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीच्या आणखी एक पाऊल जवळ पोहोचल्याचे बोलले जात आहे. | Nana Patole

मोठी बातमी: नाना पटोलेंनी घेतली राहुल गांधींची भेट; प्रदेशाध्यक्ष निवडीच्या हालचाली अंतिम टप्प्यात
दिल्लीतील 10 जनपथ या राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे.
Follow us on

नवी दिल्ली: राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर असणाऱ्या नाना पटोले (Nana Patole) यांनी बुधवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. दिल्लीतील 10 जनपथ या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, या भेटीनंतर नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीच्या आणखी एक पाऊल जवळ पोहोचल्याचे बोलले जात आहे. (Congress leader Nana Patole meets Rahul Gandhi in Delhi)

महाराष्ट्रात मोठे संघटनात्मक बदल

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षासोबत महाराष्ट्रात आणखी काही संघटनात्मक बदल केले जाणार आहेत. राज्यातील काँग्रेसचे कार्याध्यक्ष बदलण्यासाठी हायकमांड आग्रही असल्याचे कळते. विद्यमान पाच कार्याध्यक्षांसह कार्याध्यक्षपदात वाढ करण्याची पक्षश्रेष्ठींची रणनीती आहे. संघटनात्मक बदल करताना मंत्र्यांऐवजी पूर्णवेळ पक्षासाठी काम करणाऱ्यांना संधी देण्याकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठीचा कल असल्याचे समजते.

नाना पटोलेंना का प्राधान्य?

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून काँग्रेसला डावलत असल्याची चर्चा आहे. आगामी काळात हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणुका लढवण्याची शक्यताही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर बार्गेनिंग करण्यासाठी तितकाच तोलामोलाचा नेता असावा म्हणून काँग्रेसकडून अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सुनील केदार, वडेट्टीवार आणि ठाकूर यांची नावे मागे पडून नाना पटोले यांना पक्षश्रेष्ठींकडून प्राधान्य देण्यात आल्याची चर्चा आहे.

सुशीलकुमार शिंदे चुकून चुकले, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचं नाव फोडलं

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना चुकून काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदाचे नाव फोडले होते. सुशीलकुमार शिंदे यांनी अनावधानाने नाना पटोले यांचा उल्लेख आगामी प्रदेशाध्यक्ष असा केला. मात्र, पक्षाकडून याबाबत अधिकृत घोषणा झाली नसल्याचे लक्षात येताच सुशील कुमार शिंदे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आगामी प्रदेशाध्यक्ष कोण येणार हे आपल्याला माहीत नाही. मात्र, प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात चांगलं काम करत असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर राजकीय वर्तुळात सुशीलकुमार शिंदे यांच्या या अनावधानाने झालेल्या वक्तव्याची चर्चा रंगली होती.

संबंधित बातम्या:

सुशीलकुमार शिंदे चुकून चुकले, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचं नाव फोडलं!

नाना पटोले की आणखी पर्यायांचा शोध? काँग्रेस नेत्यांना दिल्लीतून पाचारण

महाराष्ट्रात ‘फायटर’ प्रदेशाध्यक्ष द्या; विजय वडेट्टीवारांची सोनिया गांधींकडे मागणी

(Congress leader Nana Patole meets Rahul Gandhi in Delhi)