AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पटोले की आणखी पर्यायांचा शोध? काँग्रेस नेत्यांना दिल्लीतून पाचारण

काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्र काँग्रेसमधील महत्त्वाच्या नेत्यांना शनिवारी दिल्लीत बोलावलं आहे. | Maharashtra Congress President

नाना पटोले की आणखी पर्यायांचा शोध? काँग्रेस नेत्यांना दिल्लीतून पाचारण
| Updated on: Jan 29, 2021 | 10:33 AM
Share

नवी दिल्ली :  महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या खांदेपालटाची चर्चा गेले काही दिवस होत आहेत. पक्षाने विधानसभा अध्यक्ष असलेले नाना पटोले यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदी जवळपास निश्चित केल्याची माहिती आहे. परंतु आता काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्र काँग्रेसमधील महत्त्वाच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना शनिवारी दिल्लीत बोलावलं आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांचंच नाव जाहीर केलं जाणार की आणखी नव्या पर्यायांचा विचार होणार, हे पाहणे महत्त्वाचे आहेत.  (Congress High Command has summoned important leaders of Maharashtra Congress to Delhi on Saturday)

काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने महाराष्ट्रातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांना उद्या (शनिवारी) दिल्लीत पाचारण केलं आहे. नवीन प्रदेशाध्यक्षपाच्या निवडीसंदर्भातील चर्चा तसंच राजधानी नवी दिल्लीत जोर धरलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणं या बैठकीत अपेक्षित आहे.

महाराष्ट्रातून या बैठकीला सध्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधानसभा अध्यक्ष तथा संभाव्य प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री आणि आताचे सार्वजनिक बांधकाम अशोक चव्हाण, मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पक्षात फेरबदलाचे वारे…

काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने एच. के. पाटील यांना राज्याचे प्रभारी नेमल्यानंतर पक्षामध्ये अनेक बदल करण्यात आले. त्यानतंर एक व्यक्ती एक पद’चा पुरस्कार करुन नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची मागणी राज्यातील काही नेत्यांनी केली. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन पक्षामध्ये फेरनिवडी करण्यात आल्या. महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी संध्या सव्वालाखे आणि मुंबईच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड करण्यात आली. त्यानंतर राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदावर नाना पटोले यांची निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी कोण…?

नाना पटोले यांच्या निवडीमुळे त्यांची विधानसभा अध्यक्षपदाची जागा रिकामी होणार आहे. त्यामुळे त्यांची जागा घेण्यासाठी सध्या काँग्रसेमध्ये शर्यत सुरु झाली आहे. या जागेसाठी अनेकांनी लॉबिंगही सुरु केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मराठवाड्यातील आमदार सुरेश वडपुरकर, आमदार संग्राम थोपटे, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांची नावं विधानसभा अध्यक्षपदाच्या चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्याची जबाबदारी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पाटील यांनीही कामाला सुरुवात केली आहे. पक्षाच्या प्रत्येक आमदाराशी वन-टू-वन चर्चा करून त्यांची मते जाणून घेण्यास पटाील यांनी सुरुवात केली आहे.

(Congress High Command has summoned important leaders of Maharashtra Congress to Delhi on Saturday)

हे ही वाचा :

विधानसभा अध्यक्षपदाची नाना पटोलेंची जागा कोण घेणार? काँग्रेस नेत्यांचं लॉबिंग सुरु

मोठी बातमी: काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदासाठी नाना पटोलेंची निवड निश्चित?

महाराष्ट्रात ‘फायटर’ प्रदेशाध्यक्ष द्या; विजय वडेट्टीवारांची सोनिया गांधींकडे मागणी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.