Akola ZP Election Result : अकोल्यात शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांना समान मतं, विजयी उमेदवार कोण? चिठ्ठीचा कौल कुणाला?

| Updated on: Oct 06, 2021 | 3:30 PM

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे जवळपास सर्व निकाल हाती आले आहेत. अकोला जिल्हा परिषदेतील 14 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. तर, पंचायत समितीच्या 28 जागांसाठीचे निकाल जाहीर झाले आहेत.

Akola ZP Election Result : अकोल्यात शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांना समान मतं, विजयी उमेदवार कोण? चिठ्ठीचा कौल कुणाला?
Election
Follow us on

अकोला: स्थानिक स्वराज संस्थामधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 85 जागा आणि पंचायत समितीच्या 144 जागांवर निवडणूक झाली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे जवळपास सर्व निकाल हाती आले आहेत. अकोला जिल्हा परिषदेतील 14 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. तर, पंचायत समितीच्या 28 जागांसाठीचे निकाल जाहीर झाले आहेत. अकोल्यात जिल्हा परिषदेत भाजपला 1, शिवसेनेला 1, राष्ट्रवादीला 2, काँग्रेसला 1 आणि इतर उमेदवारांना 9 जागांवर विजय मिळाला आहे. तर, पंचायत समितीत भाजपला 4 , शिवसेनेला 5 इतर उमेदवारांना 19 जागांवर विजय मिळाला आहे. अकोट तालुक्यातील अकोलखेड गणात दोन्ही उमेदवारांना सारखी मत मिळाल्यानं चिठ्ठी टाकून विजयी उमेदवार निवडण्यात आला आहे.चार वर्षाच्या मुलीच्या हातून ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली त्यामध्ये यामध्ये सेनेला कौल मिळाला.

शिवसेना उमेदवाराला नशीबाची साथ

अकोला जिल्ह्यातील अकोटमधील अकोलखेड गणाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार दिनकर पिपराके अणि शिवसेना उमेदवार सूरज गणभोज यांच्या चुरस अंतिम क्षणापर्यंत कायम होती. मतमोजणीमध्ये दोन्ही उमेदवारांना सारखी मतं मिळाली होती. निवडणूक प्रशासनानं अखेर विजयी उमेदवार घोषित करण्यासाठी ईश्वर चिठ्ठी टाकण्याचा पर्याय निवडला. यावेळी 4 वर्षांच्या मुलींच्या हातून ईश्वर चिठ्ठी टाकून विजयी उमेदवार निवडण्यात आला. यामध्ये शिवसेना सूरज रणभोज यांना विजय मिळाला. या मतदार संघात वंचित बहूजन आघाडीचा उमेदवार देखील होता. यामुळे मतविभाजन झालं.

महाविकास आघाडीनं आत्मचिंतन करणं गरजेचं: अमोल मिटकरी

महाविकास आघाडीची बेरीज भाजपपेक्षा सरस आहे. मात्र इथून पुढे सर्वांनी विशेषता महाविकास आघाडीने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. स्वबळावर लढलो तर भाजपला यश मिळत राहील, महाविकास आघाडीने आत्मचिंतन करणं गरजेचं, सर्वांनी एकत्र येऊन भाजपला रोखलं पाहिजे, स्वतंत्र गेलो तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. महाविकास आघाडीने एकत्र येणे आवश्यक आहे. महाविकास आघाडी जर एकत्र आली नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकीत आपण यश मिळवू शकणार नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले. प्रहार या पक्षाला कुटासा या माझ्या गावात बच्चू भाऊंच्या पक्षाला फक्त ७८ मतं आहेत, आमच्या उमेदवाराला ९५३ मतं आहेत. याचा अर्थ असा आहे, कामं केलं नसती तर मतं मिळाली नसती. पण दुर्दैवाने आमचा पराभव झाला. भाजपची मतं प्रहारने खेचली. अकोल्यात ग्रामीण भागात राष्ट्रवादीची कामगिरी चांगली आहे. माझ्या सर्कलमध्ये पराभव झाला असला तरी ग्रामीण भागात फार मोठं यश मिळालं. बच्चू कडूंनी भाजपसोबत छुपी युती केली. त्यामुळे महाविकास आघाडीला फटका बसला. त्याची दखल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घ्यावी, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली. आगामी काळात महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र राहणं या मतावर मी ठाम आहे, असं मिटकरींनी सांगितलं.

इतर बातम्या:

Amol Mitkari vs Bachhu Kadu : चुलीत गेलं मंत्रिपद, उद्या राजीनामा फेकतो, बच्चू कडू अमोल मिटकरींवर कडाडले

Akola Election Result : अमोल मिटकरींचा गावातच पराभव, बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ची धडाकेबाज एण्ट्री

maharashtra election 2021 Akola district Akot taluka Akolkhed block two candidate got same vote how winner decided