Gram Panchayat Election Result : राज्यातील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची आज मतमोजणी! 608 पैकी 51 ग्रामपंचायती बिनविरोध

| Updated on: Sep 19, 2022 | 6:44 AM

Gram Panchayat Election 2022 : ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह सरपंच पदासाठीसुद्धा मतदान रविवारी करण्यात आलं. पहिल्यांदाच सरपंचपद हे मतदान करुन निवडलं जाणार असल्यानं ही निवडणूक अधिक लक्षवेधी ठरलीय

Gram Panchayat Election Result : राज्यातील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची आज मतमोजणी! 608 पैकी 51 ग्रामपंचायती बिनविरोध
आज ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर (Maharashtra Political Crisis) पहिल्यांदाच होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा (Gram Panchayat Election Result) निकाल आज लागणार आहे. या निकालाची उत्सुकता संपूर्ण राजकीय (Politics) वर्तुळाला लागली आहे. कारण महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर राज्यात नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातली ही पहिलीच निवडणूक आहे.

एकूण 608 ग्रामपंचायतींपैकी एकूण 51 ग्रामपंचायतींमधील निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता उर्वरीत 547 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी मतदान पार पडलं. या मतांची मोजणी आज केली जाणार आहे. मतमोजणीनंतर निकालही आजच जाहीर केले जातील.

ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह सरपंच पदासाठीसुद्धा मतदान रविवारी करण्यात आलं होतं. पहिल्यांदाच सरपंचपद हे मतदान करुन निवडलं जाणार असल्यानं ग्रामपंचायतीही ही निवडणूक अधिक लक्षवेधी ठरलीय. एकूण 547 ग्रामपंचायतींमध्ये सरासरी 76 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. रविवारी शांततेत सगळीकडे मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यामुळे आज येणाऱ्या निकालानंतर विजयी गुलाल कोण उधळतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

हे सुद्धा वाचा

कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली, त्याच्या आकडेवारीवर एक नजर टाकुया.

पुणे जिल्हा

  • जुन्नर 38
  • आंबेगाव 18
  • खेड 5
  • भोर 2

अहमदनगर – अकोले 45
लातूर – अहमदपूर 1
सातारा – वाई 1, सातारा 8
कोल्हापूर – कागल 1

नाशिक जिल्हा

  • कळवण 22
  • दिंडोरी 50
  • नाशिक 17

हिंगोली औंढा नागनाथ 6
परभणी – जिंतूर 1, पालम 5

नांदेड जिल्हा-

  • माहूर 24
  • किनवट 47
  • अर्धापूर 1
  • मुदखेड 3
  • नायगाव खैरगाव 4
  • लोहा 5
  • कंधार 4
  • मुखेड 5
  • देगलूर 1

धुळे- शिरपूर 33

नंदुरबार जिल्हा-
शहादा 74 आणि नंदुरबार 75

जळगाव जिल्हा
चोपडा 11 आणि यावल 02

बुलढाणा जिल्हा-

  • जळगाव जामोद – 1
  • संग्रामपूर 1
  • नांदुरा 1
  • चिखली 3
  • लोणार 2

अकोला जिल्हा

  • अकोट 5
  • बाळापूर 1

वाशिम – कारंजा 04

अमरावती जिल्हा

  • धारमी 1
  • तिवसा 4
  • अमरावती 1
  • चांदूर रेल्वे 1

यवतमाळ जिल्हा

  • बाभुळगाव 2
  • कळंब 2
  • यवतमाळ 3
  • महागाव 1
  • आर्णी 4
  • घाटंजी 6
  • केळापूर 25
  • राळेगाव 11
  • मोरेगाव 11
  • झरी जामणी 8

12 ऑगस्ट रोजी 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली होती. त्यानुसार रविवारी मतदान झालं. तर आज मतमोजणी पार पडणार आहे. आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

अकोला जिल्हातल्या अकोट तालुक्यातील रमापूर ,गुल्लरघाट, कासोद शिवपूर,धारगड, पोपटखेड आणी बाळापूर मधील व्याळा अशा एकूण 6 ग्रामपंचायतच्या सरपंच व 30 सदस्य पदांसाठी आज रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली असून दोन्ही तालुक्यात 77.55 टक्के मतदान झालं होतं.