
मुंबईः राज्यात मोठं सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेशी फारकत घेतलेला एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) गट आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय करिश्मा दाखवतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मुंबईसहित ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकांमध्येही (Kdmc Municipal corporation) शिवसेनेची सत्ता आहे. मात्र शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे. मुंबईतील मराठी मतं आणि शिवसेना फोडण्यासाठी भाजपने मोठं राजकारण केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. आता एवढ्या मोठ्या खेळीचा महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला काय फायदा होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणुकीचा बिगुलदेखील वाजला आहे. मुंबईप्रमाणेच याही निवडणुकीला महत्त्व आहे. महापालिकेत एकूण 133 नगरसेवक आहेत. त्यापैकी 13 अनुसूचित जाती तर 4 वॉर्ड अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. महिलांसाठी 67 वॉर्ड राखीव आहेत. केडीएमसी महापालिकेत एकूण 44 प्रभाग आहेत. या महापालिकेतील एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 एवढी आहे. तर येथील अनुसूचित जातींची संख्या 1 लाख 50 हजार 171 एवढी आहे. महापालिकेतील अनुसूचित जमातींची संख्या 42 हजार 584 एवढी आहे. सध्या महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मागील निवडणुकीत एक सदस्यीय प्रभागरचना होती. यंदा मात्र तीन वॉर्डांचा एक प्रभाग करण्यात आला आहे. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 13 मध्ये मागील वेळची शिवसेनेची सत्ता टिकून राहिल का भाजपचा वरचश्मा होईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील अंतिम प्रभाग रचनेनुसार, प्रभाग 13 मध्ये अहिल्याबाई चौक, गोविंदवाडी, रोहिदास वाडा हे परिसर प्रामुख्याने येतात. यात लोकसुरभी, चंद्रमुखी, सुर्यमुखी, सर्वोदय सृष्टी, सर्वोदय पार्क, सर्वोदय रेसीडेन्सी, रेतीबंदर रस्ता, बिसमिल्ला मस्जीद परिसर, एपीएमसी मार्केट, गोविंदवाडी, भोईवाडा, रोहिदास वाडा, वल्लीपीर रोड, मच्छीबाजार, बोंबिल बाजार, इंडिया कल्ब, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसर, मदारछल्ला, बाजारपेठ रोड परिसर, घेलादेवजी चौक, कासारहाट, टिळक चौक परिसर, अहिल्याबाई चौक परिसर येतो.
प्रभाग क्रमांक 13 मधील एकूण लोकसंख्या 36 हजार 126 एवढी आहे. अनुसूचित जातींतील मतदारांची संख्या 2307 तर अनुसूचित जमातींची संख्या 1074 एवढी आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत मागील 2015 सालच्या निवडणुकीत शिवसेनेची सत्ता होती. 122 वॉर्डांसाठी 750 उमेदवार निवडणुक रिंगणात होते. या निवडणुकीत शिवसेनेचा सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या.
मागील वेळचे पक्षीय बलाबल असे-
यंदा त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. मात्र मागील वेळी प्रभाग क्रमांक 13मध्ये शिवसेनेचे दयानंद शेट्टी यांचा विजय झाला होता. यंदा प्रभाग रचनेत नवा भाग समाविष्ट झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्याही वाढली आहे.
आगामी निवडणुकांणध्ये प्रभाग 13 मधील आरक्षण पुढील प्रमाणे-
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 13 अ
| पक्ष | उमेदवार | विजयी-आघाडी |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजप | ||
| काँग्रेस | ||
| राष्ट्रवादी | ||
| मनसे | ||
| इतर |
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 13 ब
| पक्ष | उमेदवार | विजयी-आघाडी |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजप | ||
| काँग्रेस | ||
| राष्ट्रवादी | ||
| मनसे | ||
| इतर |
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 13 क
| पक्ष | उमेदवार | विजयी-आघाडी |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजप | ||
| काँग्रेस | ||
| राष्ट्रवादी | ||
| मनसे | ||
| इतर |