Nawab Malik Arrested : नवाब मलिक यांना ईडीकडून अटक, लढेंगे और जितेंगे अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Feb 23, 2022 | 3:49 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती.

Nawab Malik Arrested : नवाब मलिक यांना ईडीकडून अटक, लढेंगे और जितेंगे अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया
Nawab Malik Arrested
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. इक्बाल कासकर यानं नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर आता ईडीनं (ED) अटकेची कारवाई केली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना मेडीकलसाठी नेण्यात आलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. ईडीनं नवाब मलिक यांची आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

नवाब मलिक यांचं मेडिकल होणार

नवाब मलिक यांना घेऊन ईडीचे अधिकारी जेजे रुग्णालयात पोहोचेले आहेत. जेजे रुग्णालयात मेडिकल करण्यात येईल. त्यानंतर त्यांना न्यायालयात नेण्यात येईल. गुन्हेगारांकडून जमीन खरेदी केल्याचा ठपका नवाब मलिक यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

लढेंगे जितेंगें, नवाब मलिकांची प्रतिक्रिया

नवाब मलिक हे तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांना व्हिक्टरी साईन दाखवली. लढेंगे आणि जितेंगे डरेंगे नही, असं नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलं आहे. नवाब मलिक यांचं  जेजे रुग्णालयात अर्धा तास मेडिकल होईल. त्यानंतर न्यायालयात सुनावणी होईल, अशी माहिती आहे.

आता नंबर अनिल परब यांचा असेल, किरीट सोमय्या

अनिल देशमुखनंतर आता नवाब मलिक आणि तिसरा नंबर अनिल परब यांचा लागणार आहे. उद्धव ठाकरे यांनी कितीही दादागिरी केली तरी आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

मुंबई सेशन कोर्टातील बंदोबस्त वाढला

नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर सध्या मेडिकल करण्यात येत आहे. दुसरीकडे मुंबई सेशन कोर्टातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.  पहाटे साडे चार वाजता ईडीच्या गाड्या त्यांच्या घरी पोहोचल्या होत्या. पावणे आठच्या सुमारास नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात आणलं होतं. त्यानंतर जवळपास आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

न्यायालयीन कोठडी मिळाली तर जामीनाचा मार्ग मोकळा

नवाब मलिक यांना ईडी कोठडी मिळाली तर कायदेशीर आव्हान देण्याचा अधिकार आहे. ईडी कोठडी मिळेल की नाही याबद्दल सांगता येणार नाही. नवाब मलिक यांच्यावर काय आरोप आहेत हे सांगता येणार आहे. नवाब मलिक यांना अटक होणं हे यंत्रणेकडं सकृतदर्शनी पुरावा असावा असं वाटतं. न्यायालयात या कारवाईमागे राजकीय हेतूनं प्रेरित अटक नाही ना याची तपासणी केली जाईल. नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी मिळाली तर त्यांना जामीन मिळेल, असं उज्ज्वल निकम म्हणाले आहेत.

इतर बातम्या:

नोटीस न देता मलिकांच्या ED चौकशीला गृहमंत्र्यांचा आक्षेप; कायदा काय म्हणतो, सांगताहेत उज्ज्वल निकम…

नवाब मलिक डी गँगशी संबंधित असतील तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न, चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केली गंभीर शंका

Maharashtra NCP Minister Nawab Malik arrested by ED Money Laundering case