Maharashtra opinion poll 2019 | महाराष्ट्राचे तीन ओपिनियन पोल एकत्र

| Updated on: Oct 18, 2019 | 6:08 PM

महाराष्ट्र विधानसभेसाठी (Maharashtra opinion poll 2019) येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. मात्र विविध राजकीय संस्थांनी मतदानापूर्वी महाराष्ट्राच्या जनतेच्या (Maharashtra opinion poll 2019) मनात काय आहे, हे मत जाणून घेतलं.

Maharashtra opinion poll 2019 | महाराष्ट्राचे तीन ओपिनियन पोल एकत्र
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेसाठी (Maharashtra opinion poll 2019) येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. मात्र विविध राजकीय संस्थांनी मतदानापूर्वी महाराष्ट्राच्या जनतेच्या (Maharashtra opinion poll 2019) मनात काय आहे, हे मत जाणून घेतलं. नेता, सी व्होटर आणि जन की बात या तीन संस्थांचा ओपनियन पोल एकाच ठिकाणी, एकाच वेळी टीव्ही 9 मराठीने प्रसारित केला. हा ओपिनियन पोल सर्वस्वी त्या संस्थांचा आहे, हा सर्व्हे टीव्ही 9 मराठीने केलेला नाही.

या ओपिनियन पोलनुसार राज्यात भाजप-शिवसेना युतीचं सरकार येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील 288 जागांसाठी  एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, तर महाराष्ट्राचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी असेल. मात्र त्यापूर्वी ओपिनियन पोलमधून जनतेची मतं जाणून घेण्यात आली.

विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीचीच लाट दिसत आहे.  महाराष्ट्रात पुन्हा भाजप-शिवसेना युतीचीच सत्ता येण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या  288 पैकी 200 पेक्षा जास्त जागा भाजप-शिवसेना युतीला मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला केवळ 50 ते 60 पर्यंत  आणि अपक्ष/इतर पक्षांना 5 ते 11 पर्यंत जागा मिळण्याचे संकेत आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून विरोधकांची धूळदाण उडवली. भाजपने 303 तर एनडीएने तब्बल 352 जागांवर विजय मिळवला. दुसरीकडे काँग्रेसला 52 आणि यूपीएला मिळून 87 तर इतरांना 103 जागा मिळाल्या. तेव्हापासून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली. तेच चित्र राज्यातही पाहायला मिळत आहे.

सी वोटर (C Voter Opinion Poll)

  • महायुती – 200
  • महाआघाडी- 55
  • अपक्ष/इतर – 33 जागा

जन की बात 

  • महायुती – 225-232
  • महाआघाडी- 55
  • अपक्ष/इतर – 33 जागा

नेता सर्वेक्षण

  • महायुती – 211 जागा
  • महाआघाडी – 69
  • बविआ – 4
  • एमआयएम – 2
  • मनसे – 1
  • स्वाभिमानी – 1

नेता मतदानाआधीचा पोल (पक्षनिहाय) –

  • भाजप – 142 ते 147
  • शिवसेना – 83 ते 85
  • काँग्रेस – 21 ते 23
  • राष्ट्रवादी – 27 ते 29

नेता ओपिनियन पोलची वैशिष्ट्ये 

  • नेता पोलनुसार प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला एकही जागा नाही.
  • महायुतीला 2014 च्या तुलनेत 26 जागांचा अधिकचा फायदा
  • आघाडीला 2014 च्या तुलनेत 14 जागांचा तोटा होण्याचा अंदाज
  • राज ठाकरेंच्या मनसेला केवळ एक जागा मिळण्याचा अंदाज

तिन्ही ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार – 

  • महायुतीला एकूण 200 ते 230 जागांचा अंदाज
  • भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेच्या जवळ
  • शिवसेनेची शंभरी गाठताना दमछाक
  • वंचित, मनसेपेक्षा बविआला जास्त जागा

विभागनिहाय कल

नेता ओपनियन पोल

मराठवाडा –

  • महायुती – 37
  • महाआघाडी – 8
  • एमआयएम – 2

पश्चिम महाराष्ट्र (62)

  • महायुती – 34
  • महाआघाडी – 26
  • मनसे – 1
  • स्वाभिमानी – 1

खानदेश –

  • महायुती – 38
  • महाआघाडी – 09

विदर्भ

  • महायुती – 47
  • महाआघाडी – 13

कोकण

  • महायुती – 55
  • महाआघाडी – 14
  • बविआ – 3