Maharashtra Politics : राज्यपालांचं निवडणूक आयोगाला पत्र ते मुख्यमंत्र्यांचा मोदींना फोन, महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?

| Updated on: Apr 30, 2020 | 10:09 PM

उद्धव ठाकरेंची विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Maharashtra Politics : राज्यपालांचं निवडणूक आयोगाला पत्र ते मुख्यमंत्र्यांचा मोदींना फोन, महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
Follow us on

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानपरिषदेच्या (Maharashtra Political Happenings) रिक्त 9 जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती भारतीय निवडणूक आयोगाकडे केली. तसं पत्र राज्यापालांनी निवडणूक आयोगाला पाठवलं. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला (Maharashtra Political Happenings) पत्र पाठवलं आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्याअगोदर शिवसेनेने विधानपरिषद निवडणुकीचं पत्र दिलं. शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांसाठी निवडणूक घेण्याचे पत्र दिले. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीसाठी शिवसेनेने उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे.

उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सतीश तळेकर यांनी ही याचिका दाखल केली. उच्च न्याायालयाने राज्यपालांना निर्देश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीसाठी महाराष्ट्रात काय-काय घडतंय?

? विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्यासाठी राज्यपालांचं निवडणूक आयोगाला पत्र

? उद्धव ठाकरेंची विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका

? शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांसाठी निवडणूक घेण्याचे पत्र

? महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीला

? शरद पवारांसोबत उद्धव ठाकरेंची बैठक

? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा थेट मोदींना फोन, राज्यपाल तात्काळ निर्णय घेत नसल्याचं पाहून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना फोन केल्याची माहिती

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) कानावर घातली आहे. सध्या महाराष्ट्र कोरोनाला लढा देत आहे. अशा परिस्थितीत राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होणं योग्य नाही. त्यातून चुकीचा संदेश जाऊ शकतो. हे टाळायला हवे, असं उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितल्याची (Maharashtra Political Happenings) माहिती आहे. यावर आपण लवकरात लवकर लक्ष देणार असल्याचं सांगून मोदींनी मुखमंत्र्यांना आश्वस्त केल्याची माहिती आहे.

मागच्या दाराने सत्ता स्थापन करण्यात रस नाही : देवेंद्र फडणवीस

दुसरीकडे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सत्ता स्थापण्यास रस नसल्याची प्रतिक्रिया इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे.

“आम्हाला मागच्या दाराने सत्ता स्थापन करण्यात रस नाही. उद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेच्या नियुक्तीवरुन राज्यपाल घटनेवरुन आणि कायद्याच्या चौकटीत जे योग्य आहे, त्यानुसार निर्णय घेतील. उद्धव ठाकरे आमदार झाले आणि मुख्यमंत्रिपदी कायम राहिले तर भाजपला आनंदच आहे. राज्यात राजकीय अस्थिरता नको”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

सामनातून भाजपवर वार कायम

शिवसेनेकडून सामनातून भाजपचा समाचार घेणं सुरुच आहे. उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येनंतर शिवसेना आणि योगींच्या कार्यालयांद्वारे ट्विटर वॉर सुरु झालं आणि आता फडणवीसांवरही निशाणा साधण्यात आला.

“बुलंदशहर ते इटावापर्यंत हत्या होऊनही कोणी तेथील मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला नाही. राज्यपालांच्या घरात बसून कोणी ठिय्या मांडला नाही. शहरी नक्षलवाद्यांचा हा सर्व हैदोस असून सर्व प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा इंटरपोलकडे द्यावा, अशी मागणीही केली नाही? की राष्ट्रीय गृहमंत्र्यांनीही चिंता व्यक्त केली नाही. महाराष्ट्राप्रमाणे योगी महाराजांच्या राज्यातही आणीबाणीसदृश स्थिती निर्माण झाल्याचा बोभाटाही तेथील विरोधी पक्षाने केला नाही. महाराष्ट्रात हे सर्व कसे आणि कोणी घडवले ते गंगेप्रमाणे साफ आहे”, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा पेच कसा सोडवावा, यावर महाविकास आघाडीत खलबतं सुरु आहेत. तर शिवसेनेचे सामनातून भाजपवर निघणारे शाब्दिक बाण काही थांबताना दिसत नाहीत. त्यामुळे आता निवडणूक आयोग राज्यपालांच्या विनंतीवर काय निर्णय घेणार (Maharashtra Political Happenings) याकडे सध्या सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागून आहे.

संबंधित बातम्या :

भाजपशासित राज्यात भगवी वस्त्र लथपथ झाली, तरी चिंतेची शिंक काढायची नाही, ‘सामना’तून हल्लाबोल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना फोन, विधानपरिषद नियुक्तीबाबत चर्चा : सूत्र

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागावी हीच भाजपची इच्छा : जयंत पाटील

राज्यपालांनी फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचा अधिकार वापरला, आता त्यांना मंत्रिमंडळाचं ऐकावं लागेल : पृथ्वीराज चव्हाण