Mohit Kamboj : ग्रीन एकर्सच्या ‘गबरू जवान’मुळे महाराष्ट्र स्टेट बँकेला 1 हजार कोटीचा फटका; मोहित कंबोज यांचा नेमका निशाणा कुणावर?

मोहित कंबोज यांनी आपल्या संपूर्ण ट्विटमध्ये संबंधिताचे नाव घेतले नाहीतर त्याचा उल्लेख गबरु जवान असा केला आहे. त्यांनी यामध्ये नाव घेतले नसले तरी हे सर्व ट्विट आ. रोहित पवार यांच्याबद्दल आहे हे आता लपून राहिलेले नाही. ग्रीन एकर्स कंपनीचा 200 वेगवेगळे स्टार्ट अप्स करणाऱ्या या गबरु जवानाचे नाव थेट गिनीज बुकमध्ये रेकॅार्ड व्हायला पाहिजे असेही कंबोज म्हणाले आहेत.

Mohit Kamboj : ग्रीन एकर्सच्या गबरू जवानमुळे महाराष्ट्र स्टेट बँकेला 1 हजार कोटीचा फटका; मोहित कंबोज यांचा नेमका निशाणा कुणावर?
मोहित कंबोज
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 28, 2022 | 4:52 PM

मुंबई : एका मागून एक (Twitter) ट्विट करुन (Mohit Kamboj) मोहित कंबोज हे विरोधकांची डोकेदुखी वाढवत आहे. कालपर्यंत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण यांना उद्देशून ट्विट करणारे कंबोज यांनी आज मात्र, राष्ट्रवादीचे आमदार तथा पवार कुटुंबीयातील (Rohit Pawar) रोहित पवार यांना टार्गेट केले आहे. ग्रीन एकर्स कंपनीतील घोटाळ्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही असे रोहित पवार यांनी सांगितले असले तरी याच कंपनीच्या माध्यमातून 200 वेगवेगळे स्टार्ट अप करणाऱ्या ‘गबरु जवान’ची तर गिनीज बुकमध्येच नोंद करायला पाहिजे असा टोला नाव न घेता कंबोज यांनी रोहित पवारांना लगावला आहे. त्यांच्या या कारभारामुळे 5 वर्षाच्या काळात महाराष्ट्र स्टेट कों ॲाप बॅंकेचे 1 हजार कोटींचे नुकसान झाल्याचेही कंबोज यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.

‘गबरु जवान’ नेमका कोण?

मोहित कंबोज यांनी आपल्या संपूर्ण ट्विटमध्ये संबंधिताचे नाव घेतले नाहीतर त्याचा उल्लेख गबरु जवान असा केला आहे. त्यांनी यामध्ये नाव घेतले नसले तरी हे सर्व ट्विट आ. रोहित पवार यांच्याबद्दल आहे हे आता लपून राहिलेले नाही. ग्रीन एकर्स कंपनीचा 200 वेगवेगळे स्टार्ट अप्स करणाऱ्या या गबरु जवानाचे नाव थेट गिनीज बुकमध्ये रेकॅार्ड व्हायला पाहिजे असेही कंबोज म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कंबोज हे राष्ट्रवादीचा बडा नेता अडचणीत अशा प्रकराचे ट्विट करीत आहेत. यावरुन त्यांचा रोष आता रोहित पवार यांच्यावर आहे हे स्पष्ट झालयं.

कंबोज यांचे काय आहेत आरोप?

ग्रीन एकर्स कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळे स्टार्टअप्स करण्यासाठी 2007 ते 2012 या कालावधीत घेण्यात आलेल्या कर्जातून बॅंकेचे 1 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. असे असतानाही या बॅंकेने या गबरुला करोडो रुपयांचे कर्ज दिले आहे. या पैशावर 50 कोटी रूपयांना साखर कारखाना कार्टेल बनवत बारामती ॲग्रोने विकत घेतला आहे. तर याच कारखान्यावर पुन्हा 150 कोटींचे कर्ज घेतले गेल्याचा आरोप कंबोज यांनी नाव न घेता रोहित पवार यांच्यावर केला आहे. सबंध ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी गबरु जवान असाच उल्लेख केला आहे. मात्र हे सर्व खुलासे रोहित पवार यांच्याबाबतीत आहेत.

साखर घोटाळाही लवकरच समोर येणार?

बारामती अॅग्रोने विकत घेतलेल्या कारखान्यावर पुन्हा 150 कोटींचे कर्ज घेतले आहे. असे असले तरी HDIL – PMC बिख आणि पत्रा चाळ घोटाळ्यात गबरू जवानाने किती साखर खाल्ली आहे हे ही लवकरच कळेल अशा इशाराही कंबोज यांनी दिला आहे. त्यामुळे ग्रीन एकर्सपासून ते कारखान्यापर्यंत गेल्या काही वर्षामध्ये कसे व्यवहार झाले आहेत हे समोर आणण्याचा प्रयत्न कंबोज यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होणार का हे पहावे लागणार आहे.