एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर, महागाई भत्त्यात मोठी वाढ, आता पगार थेट…

राज्य सरकारने एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थेट पाच टक्क्यांनी वाढवण्यात आलेला आहे. या निर्णयाचा अनेक एसटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर, महागाई भत्त्यात मोठी वाढ, आता पगार थेट...
st dearness allowance
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 23, 2026 | 3:45 PM

राज्य सरकारने एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थेट पाच टक्क्यांनी वाढवण्यात आलेला आहे. या निर्णयाचा अनेक एसटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनातच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी याविषयी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर आता एसट कर्मचाऱ्यांचा पगार पाढणार आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

नेमका कोणता निर्णय घेण्यात आला?

परिवहन मंत्री विधानसभेत बोलत असताना सरकारच्या निर्णयाची सविस्तर माहिती दिली. या माहितीनुसार आता एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 58 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. घरभाडे भत्ता 8, 16, 24 टक्क्यांवरून 10, 20 आणि 30 टक्के करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. अगोदर एसटी कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ ही दोन टक्क्यांनी व्हायची. आता हीच वेतनवाढ तीन टक्क्यांनी होणार आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळावर प्रत्येक महिन्याला 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांपुढे एसटी महामंडळाच्या डोक्यावर पडणारा हा बोजा गौण आहे, असे प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले आहे.

निर्णयाचे केले जात आहे स्वागत

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पगार खूप कमी असतो, असा आरोप नेहमीच केला जातो. या विभागात काम करणारे कर्मचारीदेखील वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोनल, संप, मोर्चे यांंच्या माध्यमातून या अडचणी सरकारच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतात. वेतनवाढ, महागाई भत्ता तसेच इतर अन्य सुविधा यांच्यात सुधारणा करण्याची एसटी कर्मचाऱ्यांची अग्रणी मागणी राहिलेली आहे. असे असताना सरकारने हा एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

खासगी बसेसमध्ये अवैध पार्सल वाहतूक केली तर….

दुसरीकडे प्रताप सरनाईक यांनी खासगी बसेसमधून केल्या जाणाऱ्या अवैध पार्सलविषयीदेखील सरकारची भूमिका मांडली आहे. कोणी खासगी बसेसमधून अवैध पार्सलची वाहतूक करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे सरनाईक म्हणाले आहेत.

Follow Us