VIDEO | आपलं सरकार असलं तरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करा, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा ठाकरे सरकारला घरचा आहेर

| Updated on: Sep 06, 2021 | 9:55 AM

जरी आपलं सरकार असलं आणि आपल्या मना विरोधात काम होत असेल, तर आपल्या सत्तेत असलेल्या सरकारचा विचार न करता चक्क रस्त्यावर उतरून आंदोलने करा, असा सल्ला राजेंद्र शिंगणेंनी दिला

VIDEO | आपलं सरकार असलं तरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करा, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा ठाकरे सरकारला घरचा आहेर
Uddhav Thackeray, Rajendra Shingane, Sharad Pawar
Follow us on

बुलडाणा : राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांनी आपलं सरकार असलं तरी रस्त्यावर उतरुन आंदोलनं करा, निदर्शनं करा असा अजब सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना दिला. बुलडाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात हा प्रकार घडला. राष्ट्रवादीच्या मंत्र्यानेच ठाकरे सरकारला घरचा आहेर दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा झाला. त्या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हजारोंच्या संख्येत उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला संबोधित करताना चक्क राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरुन आंदोलने करा, निदर्शने करा असा अजब सल्ला दिला. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या.

काय म्हणाले राजेंद्र शिंगणे?

जरी आपलं सरकार असलं आणि आपल्या मना विरोधात काम होत असेल, तर आपल्या सत्तेत असलेल्या सरकारचा विचार न करता चक्क रस्त्यावर उतरून आंदोलने करा, असा सल्ला शिंगणेंनी दिला. एका मंत्र्याकडून अशाप्रकारचा सल्ला, तेही आपल्याच सरकार विरोधात दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कोरोना नियमांचं उल्लंघन

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या या मेळाव्याला उपस्थित लोकांच्या एकालाही तोंडाला मास्क नव्हता. कोरोना नियमांचे या ठिकाणी उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. सत्तेतल्या मंत्र्यांच्या कार्यक्रमताच आशा पद्धतीने कोरोना नियमाचे उल्लंघन होत असेल तर त्यांच्याकडून काय बोध घ्यावा, अशीही चर्चा आत जिल्ह्यात रंगायला सुरुवात झाली आहे.

पाहा व्हिडीओ :

कोण आहेत राजेंद्र शिंगणे?

राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा या मतदारसंघाचे शिंगणे प्रतिनिधीत्व करीत आहेत. शिंगणे हे 1995 मध्ये पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. मात्र, 2014 वगळता त्यांनी कायम सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केलं आहे. 2014 मध्ये ते विधानसभा निवडणुकीपासून दूर होते. ते सिंदखेड राजामधून पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2009 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, दोन्ही वेळा ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांना राज्यमंत्री आणि कॅबिनेटमंत्री म्हणून दहा वर्षांचा अनुभव आहे.

सहकाराची साथ

राजेंद्र शिंगणे यांचे वडील भास्करराव शिंगणे यांनी बुलडाण्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. त्यांनी सहाकाराचं जाळं जिल्हाभर विणलं. राजेंद्र शिंगणे यांनीही हे जाळं विस्तारत नेत आपला लोकसंपर्क अधिक वाढवला. त्या बळावर ते सातत्याने निवडून येत आहेत. त्यांच्याकडे विदर्भ को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्षपद होते. जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांनी सहकाराचा चांगला अभ्यास केलेला आहे. संकटात धावून जाणारा नेता, शेतकऱ्यांचा पाठिराखा म्हणूनही त्यांची सिंदखेड राजामध्ये ओळख आहे.

संबंधित बातम्या :

बदलापुरात कर्ता पुरुष गमावलेल्या भगिनींसोबत मंत्री राजेंद्र शिंगणेंचं रक्षाबंधन, भावनिक क्षण

VIDEO : इमानदारीने बोला.. नाहीतर सर्वाना जेलात घालीन; राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणेंची गावकऱ्यांना धमकी