AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहाटेच्या शपथविधीतून थेट पवारांना भेटले, पाचवेळा आमदार, चौथ्यांदा मंत्री; वाचा, कोण आहेत राजेंद्र शिंगणे

राज्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. (know about how rajendra shingane became fourth time minister?)

पहाटेच्या शपथविधीतून थेट पवारांना भेटले, पाचवेळा आमदार, चौथ्यांदा मंत्री; वाचा, कोण आहेत राजेंद्र शिंगणे
rajendra shingane
| Updated on: Apr 17, 2021 | 8:54 PM
Share

मुंबई: राज्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासना मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. औषधांचा काळाबाजार होऊ नये म्हणून त्यांचा प्रयत्न सुरू आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देऊन राजकारणाच्या जाळ्यात न अडकता अत्यंत संयमीपणे शिंगणे परिस्थिती हाताळत आहेत. कोण आहेत राजेंद्र शिंगणे? कसा आहे त्यांचा राजकीय प्रवास? यावर टाकलेला हा प्रकाश… (know about how rajendra shingane became fourth time minister?)

सहकाराची साथ

राजेंद्र शिंगणे यांचे वडील भास्करराव शिंगणे यांनी बुलडाण्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. त्यांनी सहाकाराचं जाळं जिल्हाभर विणलं. राजेंद्र शिंगणे यांनीही हे जाळं विस्तारत नेत आपला लोकसंपर्क अधिक वाढवला. त्या बळावर ते सातत्याने निवडून येत आहेत. त्यांच्याकडे विदर्भ को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्षपद होते. जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांनी सहकाराचा चांगला अभ्यास केलेला आहे. संकटात धावून जाणारा नेता, शेतकऱ्यांचा पाठिराखा म्हणूनही त्यांची सिंदखेड राजामध्ये ओळख आहे.

मतदारसंघावर मजबूत पकड

राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा या मतदारसंघाचे शिंगणे प्रतिनिधीत्व करीत आहेत. शिंगणे हे 1995 मध्ये पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. मात्र, 2014 वगळता त्यांनी कायम सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केलं आहे. 2014मध्ये ते विधानसभा निवडणुकीपासून दूर होते. ते सिंदखेड राजामधून पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2009 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, दोन्ही वेळा ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांना राज्यमंत्री आणि कॅबिनेटमंत्री म्हणून दहा वर्षांचा अनुभव आहे.

महत्त्वाची खाती सांभाळली

त्यांनी आरोग्य खाते, महसूल खात्याचे राज्यमंत्रीपदही सांभाळलेले आहे. तसेच क्रीडा आणि माहिती जनसंपर्क खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 2004मध्ये त्यांच्याकडे आरोग्य खाते देण्यात आले होते. आता त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन मंत्रीपद आहे. त्यांनी 2001, 2004, 2008 आणि आता 2019मध्ये म्हणजे तब्बल पाच वेळा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

59 वर्षात दहा मंत्री

राजेंद्र शिंगणे यांच्या रुपाने बुलडाणा जिल्ह्याला एकाच वर्षात दोनदा कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे. 2019मध्ये भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांना कामगार मंत्रीपद मिळालं होतं. कुटे आजही आमदार आहेत. परंतु, राज्यात भाजपची सत्ता नाही. मात्र, राष्ट्रवादीने शिंगणे यांना मंत्रिपद दिलं आहे. या निमित्ताने 59 वर्षात बुलडाण्याने दहा मंत्री पाहिले आहेत. तर, कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेणारे शिंगणे हे जिल्ह्यातील सहावे नेते ठरले आहेत.

पाच वर्षे निवडणुकीपासून दूर

प्रत्येक क्षेत्रातील लोक निवृत्त होईपर्यंत सक्रिय असतात. झोकून देऊन काम करत असतात. राजकारणी तर जोपर्यंत मतदार नाकारत नाहीत, तोपर्यंत निवडणूक लढत असतात. परंतु, निवडून येण्याची हमखास गॅरंटी असतानाही पाच वर्षे निवडणुकीपासून अलिप्त राहणारे शिंगणे हे एकमेव नेते असतील. त्यांनी 2014ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढली नाही. निवडणुकीपासून अलिप्त राहिले. मात्र, जिल्ह्यातील राजकारणावर पकड कायम ठेवली. जिल्हा परिषदा, पंचायत समितीवर आपले प्रतिनिधी निवडून आणत त्यांनी आपलं वर्चस्व कायम राखलं. त्या पाच वर्षात ते एकाही सरकारी बैठकांना गेले नाहीत. कोणत्याही पदावर नसल्याने जाण्याचा प्रश्नही नव्हता. मात्र, मतदारसंघातील संपर्क मात्र त्यांनी कमी होऊ दिला नाही. (know about how rajendra shingane became fourth time minister?)

दादांच्या शपथविधीचे साक्षीदार

2019मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सरकार स्थापन करण्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चा पुढे सरकत नव्हत्या. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी हात मिळवणी करून सरकार स्थापन केलं होतं. दोघांनीही भल्या पहाटे पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती. फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राजभवनातील या शपथविधीला शिंगणेही उपस्थित होते. या शपथविधीनंतर शिंगणेंनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली होती. (know about how rajendra shingane became fourth time minister?)

संबंधित बातम्या:

संघर्षशील नेता, कामगारांचा बुलंद आवाज; वाचा, कोण आहेत भाई जगताप?

नेता, अभिनेता, ‘एकच छंद गोपीचंद’; वाचा, कोण आहेत गोपीचंद पडळकर?

कांशीराम यांच्यापासून प्रेरणा; महादेव जानकरांच्या तीन भीष्म प्रतिज्ञा; वाचा, कसा आहे राजकीय प्रवास!

(know about how rajendra shingane became fourth time minister?)

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.