
“ठाकरेंची शिवसेना आणि आम्ही नॅचरल अलायन्स होतं. हिंदुत्वाची मते एकत्रित राहिल्याने फायदा झाला. ते तिकडे गेल्याने मतेही गेली. नुकसानही झालं. आता ती मते येत आहेत. त्यांनी लांगूलचालन केलं. ते राजकारण त्यांनी स्वीकारलं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. TV9 मराठीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात ते बोलत होते. TV9 मराठीचे मॅनेजिंग एडीटर उमेश कुमावत यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली.
“आमच्याकडे चेहऱ्याचा वाद नाही. जे मुख्यमंत्री असतात तेव्हा चेहऱ्याचा वाद नसतो. त्यांच्या नेतृत्वात निवडणूक होते. निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार हे सांगण्याचा अधिकार मला नाही. आमचं पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल. आज सरकार म्हणून आम्ही एकत्र जात आहोत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “गोष्टी आमच्या लेव्हलला नसतात. ती पार्लमेंट्री बोर्डात चर्चा होते. शिंदेंशी बोर्डाची चर्चा झाली असेल. आमचं पार्लमेंट्री बोर्ड, शिंदे आणि अजितदादा हे एकत्र बसून निर्णय घेतील” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘ते मला किती मोठा नेता मानतात हे त्यातून स्पष्ट होतं’
“हिंदीत म्हणतात मै अपने आपको गौरवान्वित महसूस करता हूँ, अशी माझी स्थिती आहे. त्यांना जेवताना, उठताना झोपतानाही मी दिसतो. त्यांना माझ्याशिवाय काही दिसत नाही. त्यांना ठरवलंय फडणवीस यांना टार्गेट करायचं. त्यांनी काही केलं तरी राज्यातील जनतेला माहीत आहे, माझी इमेज काय आहे. त्यांनी कितीही दुषण दिली तरी काही मते काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना माझ्यावर रोज आरोप करून विकासाचे मुद्दे बाजूला सारायचे आहेत. ते मला किती मोठा नेता मानतात हे त्यातून स्पष्ट होतं” अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
‘माझा अभिमन्यू करायचा प्रयत्न, पण…’
सुप्रिया सुळे आदेश फक्त फडणवीसांवर अटॅक करा, “ठिक आहे, यातून तुमचं राजकीय स्थान दिसून येतं. सर्वांना मिळून एकाच व्यक्तीवर अटॅक करावा वाटतो. उद्धव ठाकरे, शरद पवार, जरांगे आणि काँग्रेसही तेच करत आहेत. ते माझ्याविरोधात चक्रव्ह्यू रचत आहेत. तुम्ही चक्रव्हूय करून माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत आहात. पण मी आधुनिक अभिमन्यू आहे. चक्रव्ह्यूत जायचं आणि बाहेर यायचं मला माहीत आहे. मी माझा अभिमन्यू होऊ देणार नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विरोधकांना सुनावलं