Shikant Shinde : …म्हणूनच महाराष्ट्राचे स्टेअरिंग शिंदेंच्या हाती, मुख्यमंत्र्याच्या मुलानेच सांगितली महाराष्ट्राच्या विकासाची दिशा..!

| Updated on: Aug 28, 2022 | 11:01 PM

गत अडीच वर्षात महाराष्ट्राचा प्रवास चुकीच्या दिशेने सुरु होता. कारण तीन चाकी रिक्षाचा सारथीच योग्य नव्हता असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर आणि त्यामधील प्रमुख नेत्यांवर सडकून टीका केली आहे. आता हिंदूचे सण उत्सव बिनधास्त साजरे करण्यास मोकळीक मिळत आहे. शिवाय राज्याचा विकासही योग्य दिशेने असल्याचे प्रमुख कारण म्हणजे राज्याचे स्टेअरिंग हे योग्य सारथीच्या हाती आहे असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले आहे.

Shikant Shinde : ...म्हणूनच महाराष्ट्राचे स्टेअरिंग शिंदेंच्या हाती, मुख्यमंत्र्याच्या मुलानेच सांगितली महाराष्ट्राच्या विकासाची दिशा..!
खा. श्रीकांत शिंदे
Image Credit source: Twitter
Follow us on

ठाणे : राज्याचे (Eknath Shinde) मुख्यमंत्री हे पूर्वी (Rickshaw driver) रिक्षा चालकही होते. त्यांना रिक्षा चालवण्याचा अनुभव होता म्हणूनच आज त्यांच्या हाती महाराष्ट्राचे स्टेअरिंग आल्याचे खासदार तथा मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे. एवढेच नाहीतर रिक्षाचालक ते आतापर्यंतचा प्रवास यामुळेच त्यांच्या नेतृत्वात (Maharashtra) राज्य विकासाच्या दिशेने मार्गस्थ होत असल्याचे ते म्हणाले आहे. सारथी योग्य असला की, प्रवासही योग्य दिशेने होतो असे म्हणत काहींचे सारथी चुकीचे निघाल्याने ते भरकटले असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. सध्या सर्वकाही सुरळीत होत आहे. आता एकामागून एक सण येत असून बिनधास्त सणोत्सव साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तर महाविकास आघाडी काळात कोरोनानंतरही केवळ हिंदूच्या सणावर निर्बंध लादले जात होते असे म्हणत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तर शब्दांचा खेळ करीत सारथी चुकीचा म्हणून उद्धव ठाकरे यांच्याजवळपास असणाऱ्यांवर श्रीकांत शिंदे यांनी टोला लगावला आहे.

महाराष्ट्राचा प्रवास योग्य दिशेने

गत अडीच वर्षात महाराष्ट्राचा प्रवास चुकीच्या दिशेने सुरु होता. कारण तीन चाकी रिक्षाचा सारथीच योग्य नव्हता असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर आणि त्यामधील प्रमुख नेत्यांवर सडकून टीका केली आहे. आता हिंदूचे सण उत्सव बिनधास्त साजरे करण्यास मोकळीक मिळत आहे. शिवाय राज्याचा विकासही योग्य दिशेने असल्याचे प्रमुख कारण म्हणजे राज्याचे स्टेअरिंग हे योग्य सारथीच्या हाती आहे असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्वरीत मार्गी लागत असल्याने हे सरकार आपले अशी भावना वाढत आहे. शिवाय ज्या उद्देशाने सरकार स्थापन झाले तो उद्देश साध्य होत असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.

स्टेअरिंग मुख्यमंत्र्यांच्या हाती, जनता बिनधास्त

राज्याचे स्टेअरिंग आता कधीकाळच्या रिक्षाचालकाच्या हातामध्ये आहे. शिवाय याचा त्यांना अनुभव असल्याने महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेबद्दल निर्धास्त रहा असेच श्रीकांत शिंदे यांनी सूचित केले आहे. काही लोकांचे सारथी हे चुकीचे असल्यामुळे काही लोक वेगळ्या दिशेला गेले. पण आता पुन्हा महाराष्ट्राचा जो प्रवास आहे तो योग्य दिशेने चालू आहे असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या जे जवळ होते त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. गणेस उत्सवानिमित्त डोंबिवली पश्चिमेत दीपेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने नवीन विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या परीसरातून देखील बसेस सोडण्यात आल्या आहेत. यावेळी श्रीकांत शिंदे हे बोलत होते.

हे सुद्धा वाचा

वाहतूक कोंडीचे निवेदनही थेट मुख्यमंत्र्यांना

मुख्यमंत्री हा आपलासा वाटत असल्याने सर्वसामान्य जनता देखील थेट संवाद साधू शकत आहे. याचाच प्रत्यय एकनाथ शिंदे हे साताऱ्याला जात असताना पुण्यात आला होता. सततच्या वाहतूककोंडीमुळे वाहनधारक त्रस्त होते. यासंबंधी वाहनधारकांनी त्यांना निवेदनही दिले आणि आज ती समस्याही मार्गी लागली. त्यामुळे बघतो, करतो, फाईल पाहतो असे हे सरकार नसल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.