आता मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावे! जाणूण घ्या कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्याला काय नाव?

| Updated on: Jan 13, 2022 | 10:57 PM

राज्यातील दुकानांवर आता मराठी भाषेत नामफलक लावण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता मंत्र्यांच्या बंगल्याची नावंही गडकिल्ल्यांवरुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता मंत्र्यांचे बंगले हे गडकिल्ल्यांच्या नावां ओळखले जाणार आहे.

आता मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावे! जाणूण घ्या कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्याला काय नाव?
उदय सामंतांच्या बंगल्याला रत्नसिंधू नाव
Follow us on

मुंबई : राज्यातील दुकानांवर आता मराठी भाषेत नामफलक लावण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (State Cabinet Meeting) घेण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता मंत्र्यांच्या बंगल्याची (Ministers’ bungalows) नावंही गडकिल्ल्यांवरुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता मंत्र्यांचे बंगले हे गडकिल्ल्यांच्या नावां ओळखले जाणार आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्याला कोणत्या किल्ल्याचं नाव देण्यातं आलं आहे, ते पाहूया

कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्याला कोणतं नाव?

अ 3 – शिवगड – जितेंद्र आव्हाड

अ 4 – राजगड – दादा भुसे

अ 5 – प्रतापगड -के.सी. पाडवी

अ 6 – रायगड – आदित्य ठाकरे

अ 9 – लोहगड

बी 1 – सिंहगड – विजय वड्डेटीवार

बी 2 – रत्नसिंधू – उदय सामंत

बी 3 – जंजिरा – अमित देशमुख

बी 4 – पावनगड – वर्षा गायकवाड

बी 5 – विजयदुर्ग – हसन मुश्रीफ

बी 6 – सिद्धगड – यशोमती ठाकूर

बी 7 – पन्हाळगड – सुनील केदार

क 1 – सुवर्णगड – गुलाबराव पाटील

क 2 – ब्रह्मगिरी – संदीपान भुमरे

क 3 – पुरंदर

क 4 – शिवालय

क 5 – अजिंक्यतारा – अनिल परब

क 6 – प्रचितगड – बाळासाहेब पाटील

क 7 – जयगड

क 8 – विशाळगड

राज्यातील दुकानांवर आता मराठी पाट्या

राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक अर्थात पाट्या मराठी भाषेत असाव्यात असा निर्णय बुधवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य मंत्रीही उपस्थित होते.

कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना, तसेच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो. मात्र, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल अशा आस्थापनेस महापुरुष/महनीय महिला यांची किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत असाही निर्णय घेण्यात आला.

इतर बातम्या :

‘परिश्रम हा एकमात्र मार्ग आणि विजय हाच एकमात्र पर्याय’, कोरोना स्थितीबाबत पंतप्रधान मोदींचा राज्यांना सल्ला

‘कोरोनाची तिसरी लाट आली, राज्य सरकार, ‘हाफकीन’ने आतातरी जागं व्हावं’, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनावले खडे बोल