NCP: पहले मराठी, हिंदीत गडबड करणाऱ्या पत्रकाराला जयंत पाटलांनी सरळ शब्दात थोपवलं

जयंत पाटील म्हणाले की, आमच्याबरोबर कोणतीही चर्चा झाली नाही. पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आज सेनेने विधान केले आहे. मुंबईत येऊन बोलावं. त्यानंतर ते निर्णय घेतील असं सेनेने म्हटलं आहे. पाहू आता पुढे काय होते. त्यांनी ठाकरेंचा पाठिंबा काढला नाही. पक्षा सोडण्याचं विधान केलं नाही.

NCP: पहले मराठी, हिंदीत गडबड करणाऱ्या पत्रकाराला जयंत पाटलांनी सरळ शब्दात थोपवलं
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 23, 2022 | 5:41 PM

मुंबई : राज्यातील राजकिय घडामोडींना प्रचंड वेग आलायं. एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) बंड आणि त्यानंतर आता थेट महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिले आहेत. मात्र, महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा करा, तरच आम्ही तुमच्याशी चर्चा करू, अशी अट शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोरांनी शिवसेनेसमोर ठेवली आहे. राज्यात हे सर्व सुरू असताना जयंत पाटलांच्या विधानाची चर्चा होत आहे. त्याचे झाले असे की, जयंत पाटील बोलत असताना काही हिंदीतील पत्रकार (Journalist) गडबड करत होते. मग काय पाटलांनी आपल्या खास शैलीमध्ये सरळ शब्दात पत्रकारांना थोपवलं.

जयंत पाटील म्हणाले…

राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. महाविकास आघाडी सरकार धोक्यात आहे. यावर अनेक घडामोडी सातत्याने सुरू आहेत. यादरम्यान जयंत पाटील पत्रकारांसोबत संवाद साधत होते. मात्र, काही हिंदीतील पत्रकार गडबड करत पाटील, सतत हिंदीमध्ये प्रश्न विचारत जयंत पाटलांना बोलताना डिस्टर्ब करत होते. मग काय जयंत पाटील म्हणाले की, सुनो, गडबड मत करो. महाराष्ट्र में रहते है पहले मराठी करेंगे. फिर हिंदी में बात करेंगे. जल्दबाजी मत करो…जयंत पाटलांच्या या विधानाची आता चांगलीच चर्चा होतं.

महाविकास आघाडी सरकार धोक्यात

जयंत पाटील म्हणाले की, आमच्याबरोबर कोणतीही चर्चा झाली नाही. पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आज सेनेने विधान केले आहे. मुंबईत येऊन बोलावं. त्यानंतर ते निर्णय घेतील असं सेनेने म्हटलं आहे. पाहू आता पुढे काय होते. त्यांनी ठाकरेंचा पाठिंबा काढला नाही. पक्ष सोडण्याचं विधान केलं नाही. ते मुंबईत आले त्यांची बैठक होत असेल तर त्यानंतर पाहू, सरकार गेल्यानंतर विरोधी बाकावरच बसावं लागणार आहे. त्यात नवीन काही नाही असेही बोलताना जयंत पाटील म्हणाले आहेत.