AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माणिकराव कोकाटेंना जंगली रमीचा ब्रँड अम्बेसिडर करा, ‘या’ नेत्याने केली मागणी

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोकाटेंवर टीका करत त्यांना जंगली रमीचा ब्रँड अम्बेसिडर करण्याची मागणी केली आहे.

माणिकराव कोकाटेंना जंगली रमीचा ब्रँड अम्बेसिडर करा, 'या' नेत्याने केली मागणी
Kokate Rummy Photo
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 21, 2025 | 4:13 PM
Share

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. तसेच कोकाटेंच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोकाटेंवर टीका करत त्यांना जंगली रमीचा ब्रँड अँबेसिडर करण्याची मागणी केली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

माणिकराव कोकाटेंना जंगली रमीचा ब्रँड अम्बेसिडर करा

जितेंद्र आव्हाड यांनी, ‘ते जुगार खेळत होते तर खेळत होते. आता छोटा व्हिडीओ बाहेर आला मोठा व्हिडिओ आला असता तर काय झालं असतं. आता अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी कोकटेंवर कारवाई करावी. माणिकराव कोकाटेंवर कारवाई करा आणि त्यांना जंगली रमीचा ब्रँड अम्बेसिडर करा’ अशी मागणी केली आहे. तसेच माणिकराव कोकाटे पत्ते खेळताना दिसत आहेत, त्यांचा राजीनामा घ्या असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

पडळकरांवरही टीका

काही दिवसांपूर्वी विधानभवन परिसरात जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात शा‍ब्दिक बाचाबाची झाली होती. यावर बोलताना आव्हाड म्हणाले की, ‘त्यांच्याच आमदारांनी खूनवायचं आणि त्यांच्या आमदारांनी मारायचं असं सुरु आहे. तो माणूस शरद पवार शरद पवारांच्या कन्येबद्दल अश्लील भाषेत बोलतो. तो माणूस उद्धव ठाकरे यांना सूर्याजी पिसाळ ची अवलाद म्हणतो म्हणजे बाळासाहेब ठाकरे सूर्याजी पिसाळ का?. पवार साहेबांना कोणी काही बोललं तरी आम्ही अंगावर जाणारे माणसं आहोत असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का?

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. आता त्यांच्या राजीनाम्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं विधान तटकरेंनी केलं आहे. त्यामुळे आता कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवार निर्णय घेणार आहेत.

Follow Us
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा