Deepali Sayed : ‘झाल्या असतील चुका कित्येक माफ करूनी एकत्र यावे’; दीपाली सय्यद यांच्या रक्षाबंधनाच्या अनोख्या शुभेच्छा

शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Syed) यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच शिंदे गटाने पुन्हा एकदा शिवसेनेत यावे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.

Deepali Sayed : झाल्या असतील चुका कित्येक माफ करूनी एकत्र यावे; दीपाली सय्यद यांच्या रक्षाबंधनाच्या अनोख्या शुभेच्छा
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 11, 2022 | 2:15 PM

मुंबई : आज रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन हा सण सर्वत्र उत्साहात साजरा होताना दिसत आहे. दरम्यान दुसरीकडे शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Syed) यांनी देखील रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतानाच पुन्हा एकदा शिंद गटाने शिवसेनेत (Shiv Sena) यावे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे. ‘शिवबंधन आजही सर्व शिवसैनिकांच्या हातात आहे. धागा कितीही साधा असला तरी आपले शिवसेना परिवाराचे नाते हे अतुट आहे. झाल्या असतील चुका कित्येक पटीने सर्व माफ करून एकत्र यावे हिच रक्षाबंधनानिमित्त मंगलमय शुभेच्छा’ असं ट्विट दीपाली सय्यद यांनी केले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी भूमिका दीपाली सय्यद यांची सुरुवातीपासूनच राहिली आहे. त्यांनी यापूर्वी देखील एकदा ट्विट करून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे भेटणार असल्याचे म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा ट्विट करत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी अपेक्षा सय्यद यांनी व्यक्त केली आहे.

दीपाली सय्यद यांनी दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

सर्व शिवसैनिक हे शिवबंधनात बांधले गेलेले आहेत. धागा कितीही साधा असला तरी मात्र शिवसेनेसोबतचे शिवसैनिकाचे नाते अतुट आहे. चुका झाल्या असतील त्या विसरून सर्वांनी एकत्र यावे सर्वांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा अशा अशयाचं ट्विट दीपाली सय्यद यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांची आहे. त्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. त्यांनी यापूर्वी देखील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भेटणार असल्याचे ट्विट केले होते. मात्र तेव्हा भेट होऊ शकली नव्हती. दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा ट्विट करत सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच पुन्हा एकत्र यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

यापूर्वीही केले होते ट्विट

यापूर्वी दीपाली सय्यद यांनी एक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्यांनी असा दावा केला होता की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे भेटणार आहेत. मात्र ही भेट होऊ शकली नाही. त्यानंतर वाद वाढतच गेले एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील दुरावा आणखी वाढला.