AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…तर ओबीसी आरक्षण रद्द होईल’, मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य

मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात आज मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. त्यांच्या टीकेबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी मनोज जरांगे यांनी भुजबळांवर सडकून टीका केली. तसेच त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं.

'...तर ओबीसी आरक्षण रद्द होईल', मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य
Manoj Jarange Patil
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 09, 2023 | 7:27 PM
Share

लातूर | 9 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज इंदापूर येथे ओबीसी एल्गार सभेत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. त्यांच्या टीकेला आता मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. “माझी पुन्हा एकदा अजित पवार यांना विनंती आहे की, तुम्ही त्यांना समज द्या. आम्ही त्यांच्याविरोधात बोलायचं बंद केलं आहे. त्यांचं नाव घेणं बंद केलं आहे. नाहीतर मग मी पुन्हा सुरु करेन. आम्ही दिवसरात्र कार्यक्रम घेत असलो तरी सरकार आणि प्रशासनाचं जे काम आहे, शांतता राखणं ते काम आम्ही जनता म्हणून करतोय”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“छगन भुजबळ म्हणतील तसा कायदा चालत नसतो. शासकीय नोंदी रद्द होत नसतात. कुणबी नोंदी रद्द केल्या तर ओबीसींचं सगळं आरक्षण रद्द होईल. देशातील सर्व ओबीसींचं आरक्षण रद्द करावं लागेल. आमचे पुरावे असून रद्द होत असतील तर त्यांचं आरक्षण तर कशाच्याच आधारावर दिलेलं नाही. जात म्हणून दिलेलं आरक्षण आणि व्यवसाय म्हणून दिलेलं आरक्षण मग राहत नसतं. आमचे तर पुरावे आहेत. पण तसं होत नसतं. कायदा कायद्याच्या जागेवर असतो”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

‘…तर एकाच दिवशी सगळं ओबीसी आरक्षण रद्द होईल’

“छगन भुजबळ मंत्री झाले आहेत. ते मंत्रीपदाचा गैरवापर करत आहेत. गोरगरीबांवर केस करायला लावतो, त्यांच्या हॉटेल जाळून गोरगरीबांची लेकरं गुंतवत आहे. त्यांना वाटतं की, मी पदावर बसलो आहे. बोललो तर होईल. पण दिलेले प्रमाणपत्र हे आधीचे असो किंवा आताचे असो, ते रद्द होत नाहीत. कारण ते शासकीय नोंदी आहेत. तसं जर झालं तर ओबीसीचं सगळं आरक्षण एकाच दिवशी रद्द होऊ शकतं. कुणाचाच राहू शकत नाही. पण ते म्हणतील तसं होणार नाही”, असं मनोज जरांगे म्हणाले.

“या अधिवेशनातच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदा पारित होईल. शंभर टक्के, त्यांनी 24 डिसेंबरपर्यंत वेळ घेतला आहे. नाही झाली तर आम्ही लढायला सज्ज आहोत. मराठा समाजाच्या शासकीय नोंदी मिळाल्या आहेत”, असं मनोज जरांगे म्हणाले.

जरांगेंची भुजबळांवर टीका

“छगन भुजबळ प्रत्येक जागेवर जावून जातीय तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये करत आहेत. दंगली भडकतील, ओबीसी आणि मराठा समाजात वाद होईल, असे वक्तव्ये करत आहेत. आम्ही गाव खेड्यातले गोरगरीब मराठे आणि गोरगरीब ओबीसी बांधव आम्ही आजही एकमेकांवर प्रेम करतो, एकमेकांच्या सुख-दु:खात जातो. यांचं स्वप्न आहे, यांना दंगल घडवायची आहे आणि राजकीय फायदा उचलायता आहे. मी गावागावात जावून मराठा बांधवांना आवाहन करतोय. आरक्षण मिळेपर्यंत शांत राहा कारण आपल्याला जातीय तेढ निर्माण करायचा नाही. जे काम प्रशासन करतंय तेच काम आम्ही शांततेचं काम करतोय”, असं मनोज जरांगे म्हणाले.

Follow Us
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र