Maratha reservation |..मग मराठा विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लावणार का?, वडेट्टीवारांचा सवाल

| Updated on: Dec 24, 2020 | 1:25 PM

मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशावेळी या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लावणार का? असा सवाल वडेट्टीवार यांनी संभाजीराजेंना केलाय.

Maratha reservation |..मग मराठा विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लावणार का?, वडेट्टीवारांचा सवाल
चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या बांधावर
Follow us on

मुंबई: मराठा समाजाला EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारच्या भूमिकेत गडबड असल्याचा आरोप केला आहे. संभाजीराजेंच्या या आरोपाला सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशावेळी या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लावणार का? असा सवाल वडेट्टीवार यांनी संभाजीराजेंना केलाय. (OBC leader Vijay Vadettiwar supports EWS reservation)

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना त्यांचा हक्क मिळायला हवा. त्यामुळे काहीतरी मध्यम मार्ग काढणं गरजेचं होतं. अशा स्थितीत सर्वांना विश्वासात घेऊनच EWSचा निर्णय घेतल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. हा निर्णय कुणाच्याही दबावापोटी घेतलेला नाही. तर मंत्रिमंडळानं सर्वांशी चर्चा करुनच एकमताने हा निर्णय घेतला आहे. मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान टाळता यावं यासाठीच हा निर्णय घेतल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं. मराठा समाजाला EWS मध्ये मिळणाऱ्या सर्व सवलती मिळणार असल्याचा दावाही वडेट्टीवारांनी केलाय.

काही मंडळींचा राजकीय खेळ सुरु- अशोक चव्हाण

काही मंडळींचा राजकीय खेळ सुरु आहे. दोन्ही बाजूंनी बोलणारी लोकं आहेत. निर्णय घेतला तर त्याला विरोध करायचा, अशी भूमिका घेतली जात असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. “मराठा समाजाला EWSच्या सवलतीचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. तेव्हा संभाजीराजे, विनायक मेटे आणि काही लोकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय स्थगित ठेवला. मात्र, SEBCच्या उमेदवारांना EWSचा लाभ मिळावा म्हणून काहीजण कोर्टात गेले. उच्च न्यायालयाने 12 ते 13 प्रकरणात EWSचं आरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. तसंच त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. EWS आरक्षणाचा कायदा आहे. त्याचा फायदा घेण्यापासून कसं रोखू शकतो?”असा प्रश्न विचारत त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

खासदार संभाजीराजे आक्रमक

“आतापर्यंत मी सरकार सकारात्मक असल्याचं म्हणत होतो. पण आता आपल्याला गडबड वाटत आहे. 25 जानेवारीला मराठा समाजाच्या आरक्षणावर सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच सरकार हतबल झाल्यासारखं वाटत आहे. म्हणून हा EWSचा मुद्दा रेटला जात आहे का?” असा प्रश्न संभाजीराजे यांनी विचारलाय. सरकार ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. सरकारच्या भूमिकेत आता आपल्याला गडबड दिसून येत असल्याचं खळबळजनक वक्तव्य संभाजीराजे यांनी केलंय. येत्या 25 जानेवारीच्या सुनावणीत काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असेल, अशी आक्रमक भूमिका खासदार संभाजीराजे यांनी घेतलीय.

संबंधित बातम्या:

शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिलं, आता मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार? : संभाजीराजे

Maratha reservation | काही मंडळींचा राजकीय खेळ सुरु! अशोक चव्हाणांचा कुणावर निशाणा?

OBC leader Vijay Vadettiwar supports EWS reservation