सदाभाऊंसारखं मलाही मंत्रिपद मिळेल, पण गुलामी करणं मला जमत नाही : बच्चू कडू

| Updated on: Jun 11, 2019 | 2:56 PM

"सदाभऊ खोत यांच्यासारखं मलाही मंत्रिपद मिळेल, मात्र मला गुलामी करायला जमत नाही." अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली.

सदाभाऊंसारखं मलाही मंत्रिपद मिळेल, पण गुलामी करणं मला जमत नाही : बच्चू कडू
Follow us on

अहमदनगर : प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अमरावतीतील अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर जहरी टीका केली आहे. “सदाभऊ खोत यांच्यासारखं मलाही मंत्रिपद मिळेल, मात्र मला गुलामी करायला जमत नाही.” अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आढळगावात आमदार बच्चू कडू बोलत होते. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी शेतमालाचा भाव, कर्जमाफीवरुन सरकारला चांगलंच धारेवर धरलं.

शेतकऱ्यांच्या वाटेला जाल तर उभा चिरु, असा म्हणणारा कार्यकता तयार झाला पाहिजे, असा सल्ला आमदार बच्चू कडू यांनी दिला. तसेच सरकार तुमच्या घराला सोन्याची कौले बांधून देऊ शकते, मात्र तुमच्या मालाला भाव देऊ शकत नाही, कारण सोन्याच्या कौलात कमिशन मिळतं, अशी टीका बच्चू कडू यांनी मोदी सरकारवर केली.

निवडणुकी आधी लोक शेतमालाच्या भाव आणि कर्जमाफी वर बोलत होतेय, तसेच नाराजी व्यक्त करत होतेय, मात्र निकाल पाहिले तर चित्र वेगळं दिसतेय. अस मात्र त्यांनी व्यक्त केलाय.

त्याचबरोबर काँग्रेसचा देखील खरपूस समाचार आमदार बच्चू कडू यांनी घेतलाय. काँग्रेसला तर संपूर्ण भुईसपाट करून टाकले तर एक कसा आला निवडणून आला त्याने चमत्कार कसा केला माहीत नाही असा टोला कडू यांनी लगावलाय.

तसेच मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर देखील जळजळीत टीका कडू यांनी केलीये. मला देखील सदाभाऊ खोत सारख मंत्री पद मिळेल मात्र मला गुलामी करायला जमत नाही असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय.