आमदार निलेश लंकेंनी अरेरावी, शिवीगाळ, मारहाण केली नाही; ‘त्या’ लिपिकाचा खुलासा! नेमंक प्रकरण काय?

| Updated on: Aug 05, 2021 | 9:04 PM

आपण कुठलिही तक्रार केली नसल्याचा खुलासा संबंधित लिपिकाने केलाय. तसंच आपल्याला आमदार निलेश लंके यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अरेरावी, शिवीगाळ किंवा मारहाण झाली नसल्याचंही त्या लिपिकाने म्हटलंय.

आमदार निलेश लंकेंनी अरेरावी, शिवीगाळ, मारहाण केली नाही; त्या लिपिकाचा खुलासा! नेमंक प्रकरण काय?
निलेश लंके यानी मारहाण केली नसल्याचा रुग्णालयातील लिपिकाचा खुलासा
Follow us on

अहमदनगर : पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्याकडून ग्रामीण रुग्णालयाचे कनिष्ठ लिपिक राहुल दिलीप पाटील यांना मारहाण आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याची चर्चा सुरु होती. त्याबाबत पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या सहीसह एक तक्रार अर्जही व्हायरल होत आहे. मात्र, याबाबत आपण कुठलिही तक्रार केली नसल्याचा खुलासा संबंधित लिपिकाने केलाय. तसंच आपल्याला आमदार निलेश लंके यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अरेरावी, शिवीगाळ किंवा मारहाण झाली नसल्याचंही त्या लिपिकाने म्हटलंय. (MLA Nilesh Lanke accused of beating clerk in government hospital)

आमदार निलेश लंके यांनी मला कोणत्याही प्रकारची अरेरावी, शिवीगाळ किंवा मारहाण केलेली नाही. त्यांच्याविरोधात कोणताही तक्रार अर्ज केला नाही. आमदार साहेबांकडून मला मारहाण झाल्याची पोस्ट फिरत आहे. तसंच समाजमाध्यमातून आपली बदनामी होत असल्याचंही त्या लिपिकाने म्हटलंय. त्यामुळे आमदार लंके यांनी संबंधित लिपीकाला मारहाण केल्याची बातमी चुकीची असल्याचं आता सांगितलं जात आहे.

राहुल दिलीप पाटील यांचा खुलासा

बुधवार, 4 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाज्याच्या सुमारास रुग्णालय अधीक्षक डॉ. सौ. उंद्रे यांनी फोन करुन मला रुग्णालयात बोलावले होते. त्यावेळी तिथे कोविड लसीकरण टोकन वाटपावरुन गोंधळ सुरु होता. सदर गोंधळाबाबत कोणत्यातरी तक्रारीवरुन शाहनिशा करण्यासाठी आमदार निलेश लंके तिथे आले होते. त्यांनी रुग्णालय अधीक्षकांना गोंधळाबाबत जाब विचारला. त्यानंतर झाल्या प्रकाराबाबत आमदार लंके, गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्या समक्ष पंचनामा केला. झालेल्या प्रकराबाबत उंद्रे यांनी माफी मागितली. त्यानंतर आमदा तिथून निघून गेले

5 ऑगस्ट च्या सुमारास तालुक्यातील काही राजकीय मंडळी ग्रामीण रुग्णालय येथे आले होते. त्यांनी काही राजकीय मंडळी ग्रामीण रुग्णालय येथे आले होते. त्यांनी काही पत्रकारांना माझा फोन नंबर देऊन आमदार लंके यांनी मारहाण केल्याचं आणि शिवीगाळ केल्याचं बोल असं मला सांगण्यात आलं. दबावापोटी मी घाबरलो आणि त्यांनी सांगिल्याप्रमाणे स्टेटमेंट दिलं. प्रत्यक्षात तसं काहीही घडलेलं नाही.

आमदार लंके यांनी मला शिवीगाळ किंवा मारहाण केलेली नाही. सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या पोस्ट चुकीच्या आणि माझी बदनामी करणाऱ्या आहेत. याबाबत चुकीची आणि खोटी पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध मी रीतसर तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

लसीकरणाबाबत टोकन वाटपावेळी आमदार निलेश लंके आणि डॉ. कावरे यांनी कनिष्ठ लिपिक राहुल पाटील यांच्यावर टोकन वाटपात पैसे घेतल्याचा आरोप केला. तसंच या प्रकरणाची कुठलीही शाहनिशा न करता आमदार लंके यांनी त्यांना मारहाण केली. तसंच अन्य दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. ही घटना गटविकास अधिकारी आणि पारणेर पोलीस निरीक्षक बळप यांच्यासमोर घडल्याचंही बोललं जात आहे. याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी जिल्हा शल्य चिकित्सकाकडे पत्राद्वारे केली आहे.

इतर बातम्या :

कोरोनामुळे उपासमारीचं संकट ओढावलेल्या शेकडो लोककलावंतांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा, कोविड दिलासा पॅकेजला मान्यता

“अमृता फडणवीस यांना काम नाही, भाजपने त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक करावी” मनिषा कायंदेंचा टोला

MLA Nilesh Lanke accused of beating clerk in government hospital