AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार निलेश लंके यांनी करुन दाखवलं, शरद पवारांच्या नावाने दुसऱ्यांदा उभारलं 1 हजार बेडचं कोविड सेंटर

आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांच्या नावाने उभारले 1 हजार बेडचं कोविड सेंटर दुसऱ्यांदा उभारलं आहे. Nilesh Lanke covid centre

आमदार निलेश लंके यांनी करुन दाखवलं, शरद पवारांच्या नावाने दुसऱ्यांदा उभारलं 1 हजार बेडचं कोविड सेंटर
निलेश लंके, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस
| Updated on: Apr 18, 2021 | 3:19 PM
Share

अहमदनगर: महाराष्ट्रात शनिवारी 67 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आलाय. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी कोविड सेंटर उभारली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांच्या नावाने उभारले 1 हजार बेडचं कोविड सेंटर दुसऱ्यांदा उभारलं आहे. (Maharashtra NCP MLA Nilesh Lanke started one thousand bed covid centre in Parner)

कोविड सेंटर नेमकं कुठं आहे?

अहमदनगरला आमदार निलेश लंके यांनी दुसऱ्यांदा शरद पवारांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केलंय. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे तब्बल 1 हजार 100 खाटांच हे कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. यामध्ये शंभर ऑक्सिजन बेड आहेत. विशेष म्हणजे या कोरोना उपचार केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे.

कोविड सेंटरसाठी मदतीचा ओघ

आमदार निलेश लंके यांनी आवाहन केल्यानंतर 17 लाख रोख रक्कम आणि पाच टन धान्य जमा झाले आहे. तर, भाजीपाला, फळे, अंडी, किराणा, वाफ घेण्याची यंत्रे, कोमट पाण्यासाठी थर्मास अशा विविध वस्तूंचं वाटप रुग्णांना करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहेय. तसेच सर्वांनी काळजी घेण्याची आवाहनही निलेश लंके यांनी केलं आहे.

निलेश लंके यांच्याकडून यापूर्वीही कोविड सेंटरची उभारणी

आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने यापूर्वी पारनेरमधील टाकळी ढाकेश्वर इथं 1000 बेडचे सुसज्ज कोव्हिड सेंटर उभे केले होते. त्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी पौष्टिक नाश्ता आणि जेवणासोबतच करमणुकीच्या साधनांचीही व्यवस्था करण्यात आलेली. त्या सेंटरमध्ये खास रुग्णांसाठी प्रोजेक्टर, मोबाईल गेम आणि कॅरम बोर्ड अशा अनेक गोष्टींची व्यवस्था करण्यात आली होती. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते (17 ऑगस्ट) त्याचे उद्घाटन करण्यात आले होते.

संबंधित बातम्या:

‘मी राष्ट्रवादीकडून निवडणुकीत उभा होतो, तरीही मला भैयांचे आशिर्वाद होते’, आमदार निलेश लंकेंना अश्रू अनावर

आमदारांच्या बेडवर कार्यकर्ते, दिलदार निलेश लंकेंची माणुसकी, झोपेतून न उठवता स्वत: सतरंजीवर झोपले!

(Maharashtra NCP MLA Nilesh Lanke started one thousand bed covid centre in Parner)

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.