आमदारांच्या बेडवर कार्यकर्ते, दिलदार निलेश लंकेंची माणुसकी, झोपेतून न उठवता स्वत: सतरंजीवर झोपले!

| Updated on: Mar 09, 2020 | 12:44 PM

नगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke sleeps on Mat) हे त्याला अपवाद ठरलेत.

आमदारांच्या बेडवर कार्यकर्ते, दिलदार निलेश लंकेंची माणुसकी, झोपेतून न उठवता स्वत: सतरंजीवर झोपले!
Follow us on

मुंबई : निवडणुकीपुरतं कार्यकर्त्यांना वापरुन घेऊन, त्यानंतर त्यांच्याकडे ढुंकूनही न पाहणारे राजकारणी पावलोपावली दिसतात. मात्र नगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke sleeps on Mat) हे त्याला अपवाद ठरलेत. निलेश लंके यांनी स्वत: आपला बेड कार्यकर्त्यांना झोपण्यासाठी दिला आणि स्वत: सतरंजीवर झोपले. त्याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (MLA Nilesh Lanke sleeps on Mat)

मुंबईतील आमदार निवासात, कार्यकर्ते गादीवर आणि आमदार निलेश लंके सतरंजीवर झोपल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतील आमदार निवासात त्या त्या मतदारसंघातील लोकांना आमदारांच्या पत्राने तात्पुरती निवाऱ्याची सोय होते. बाहेरगावावरुन आलेले नागरिक आपली मुंबईतील कामं आटोपून गावी परततात.

अशाच कामांसाठी आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील कार्यकर्ते मुंबईतील आले होते. आमदार निलेश लंके हे आमदार निवासात आले त्यावेळी कार्यकर्ते आधीच त्यांच्या बेडवर झोपेले होते. ते पाहून निलेश लंके यांनी बाजूची सतरंजी जमिनीवर टाकली आणि खालीच झोपणे पसंत केलं.

आमदार निलेश लंके हे रात्री उशिरा आपल्या निवासस्थानी गेले त्यावेळी त्याठिकाणी अनेक कार्यकर्ते झोपले होते. विशेष म्हणजे आमदारांच्या बेडवरदेखील कार्यकर्ते झोपल्यामुळे निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांना न उठवता कोपर्‍यात सतरंजी अंथरुण झोपले.

लंके यांचा हा व्हिडिओ सध्‍या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातून लंके यांचं कौतुक केले जात आहे. अनेक वेळा आमदारांचा बडेजाव पाहायला मिळतो मात्र लंके यांची साधी राहणीमान पाहून सध्या त्यांचे कौतुक होत आहे.

मी कार्यकर्त्यांच्या जोरावर आमदार

दरम्यान, मी या कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडून आलो आहे, त्यामुळे यात काही विशेष वाटत नाही अशी प्रतिक्रिया आमदार लंके यांनी या प्रकारानंतर दिली.

मला लोकांनी आमदार केलं आहे. खेड्यापाड्यातील लोक मुंबईत आल्यावर त्यांना राहण्याची सोय आमदार निवासात होते. मी खोलीत गेलो त्यावेळी कार्यकर्त्ये झोपले होते, त्यांना उठवून मी तिथे झोपणे योग्य नव्हते. मला त्यात काहीही विशेष वाटलं नाही, असं निलेश लंके म्हणाले.

कोण आहेत आमदार निलेश लंके?

  • निलेश लंके हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत
  • ते नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात
  • निलेश लंके हे आधी शिवसेनेत होते. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला
  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीत लंक यांनी शिवसेना आमदार विजय औटी यांचा पराभव केला