कोरोनामुक्त होताच रोहित पवार कर्जत नगरपंचात निवडणुकीच्या मैदानात, विजयाची रणनितीही सांगितली!

| Updated on: Jan 12, 2022 | 7:27 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार तिसऱ्या लाटेत मात्र कोरोना पॉझिटिव्ह आले. 3 जानेवारी रोजी रोहित पवार यांनी आपण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली होती. त्यानंतर आता रोहित पवार कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनावर मात केल्यानंतर ते पुन्हा एकदा कर्जत नगर पंचायत निवडणुकीच्या मैदानात पाहायला मिळाले.

कोरोनामुक्त होताच रोहित पवार कर्जत नगरपंचात निवडणुकीच्या मैदानात, विजयाची रणनितीही सांगितली!
रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

अहमदनगर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशावेळी सर्वपक्षीय नेतेमंडळी कोरोनाच्या तावडीत सापडत आहे. त्यात पहिल्या, दुसऱ्या लाटेत कोरोनाचा थोपवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) तिसऱ्या लाटेत मात्र कोरोना पॉझिटिव्ह आले. 3 जानेवारी रोजी रोहित पवार यांनी आपण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली होती. त्यानंतर आता रोहित पवार कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनावर मात केल्यानंतर ते पुन्हा एकदा कर्जत नगर पंचायत निवडणुकीच्या मैदानात पाहायला मिळाले.

कोरोनामुक्त झाल्यानंतर रोहित पवार यांनी थेट मतदारसंघ गाठला. कर्जत नगर पंचायतीच्या उर्वरित चार जागांच्या निवडणूक प्रचारासाठी ते पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. यावेळी कार्यकर्ते आणि महिलांनी औक्षण करुन रोहित पवारांचं स्वागत केलं. त्यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, कोरोनातून बरे होण्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली होती. त्यामुळे कालच प्राथमिक चाचणी निगेटिव्ह आली. डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली होती. लोकही सांगतात की विश्रांती घ्या. पण निवडणूक आहे. लोकांमध्ये आल्यावर एक वेगळी ऊर्जा मिळते. विधानसभेला कार्यकर्ते माझ्यासाठी पळाले. आता त्यांच्यासाठी लोकांना विनंती करणं माझं काम आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिलीय.

शरद पवारांवरील भाजपच्या टीकेला रोहित पवारांचं उत्तर

शरद पवार हे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का? असं वक्तव्य भाजपकडून केल्यानंतर रोहित पवारांनी त्यांनी जोरादार प्रत्युत्तर दिले आहे, त्यामध्ये ते म्हणतात की “देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असताना सुध्दा पवार साहेब जनतेमध्ये मिसळून त्यांची मदत करताना दिसतात.” कोरोनाच्या काळात एकही दिवस घरी न बसता त्यांनी जनतेला मोठ्या प्रमाणात आधार दिला.

तसेच त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याही वक्तव्याचा कडकडून समाचार घेतला आहे. फडणवीस म्हणाले होते की, “जनमताची चोरी होऊ देणार नाही” त्यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणतात की, “त्यांच्याकडे गोव्याची जबाबदारी असल्याने त्यांना अशी अर्थहीन वक्तव्य त्यांना करावी लागतात.” अनेक पक्षांची एकत्र लढण्याची पवार साहेबांची तयार सुरू असल्याचे सुध्दा रोहित पवारांनी म्हटलं आहे. गोव्यात शरद पवारांच्या विरोधात अपप्रचार केल्याशिवाय देवेंद्र फडणवीसांना पर्याय नाही. कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीचं नसल्याने ते अशा पध्दतीची टीका वारंवार करत असतात. असेही ते म्हणाले.

इतर बातम्या :

Maharashtra Corona Update : राज्यात तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण! सेल्फ कोरोना टेस्ट करणाऱ्यांनाही आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

UP Assembly Election 2022 : काल राजीनामा, आज अटक वॉरंट! स्वामी प्रसाद मौर्यांविरोधात ‘सोची समझी साजीश’?