मनसे-भाजप एकत्र येणार नाहीत : एकनाथ खडसे

| Updated on: Jan 23, 2020 | 6:16 PM

मनसे आणि भाजपमध्ये हिंदुत्वाचा धागा असला तरी भाजपचे व्यापक स्वरुप आहे," अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी (Eknath khadse on bjp mns alliance) दिली.

मनसे-भाजप एकत्र येणार नाहीत : एकनाथ खडसे
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज (23 जानेवारी) गोरेगाव येथे पहिलं अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी मनसेने पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण (Eknath khadse on bjp mns alliance) केलं. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे-भाजप एकत्र येतील. हिंदुत्वाच्या मुद्दयावर त्यांची युती होईल अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र “भाजप मनसे एकत्र येतील असे वाटतं नाही. मनसे आणि भाजपमध्ये हिंदुत्वाचा धागा असला तरी भाजपचे व्यापक स्वरुप आहे,” अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी (Eknath khadse on bjp mns alliance) दिली.

“भाजप आणि मनसे एकत्र येतील असं वाटतं नाही. मनसे आणि भाजपमध्ये हिंदुत्वाचा धागा असला तरी भाजपचे व्यापक स्वरुप आहे. प्रांत वाद करणार नाही. त्यामुळे मनसे आमच्यासोबत येईल असे वाटत नाही. मनसेचे जर परकीयाचे धोरण असेल, तर त्यात बदल करुन अनुकरण करतील त्यावेळीचा हा प्रश्न आहे. आज तरी मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता जवळपास नसल्यासारखी आहे”, असे एकनाथ खडसे म्हणाले.

मनसेच्या भगवंमय होण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार असल्याचं म्हटलं जात आहे, असा प्रश्न खडसेंना विचारला असता ते म्हणाले, “यामागे शरद पवार असतील, असं वाटतं नाही. प्रत्येक ठिकाणी पवारांचा हात आहे. कोणीही आले की, पवारांचा हात आहे. हे सर्व म्हणणं आता जुनं झालं आहे. मनसे भाजप एकत्र येतील, असे या क्षणाला मला वाटत नाही. होतील, नाही होतील ही पुढची गोष्ट आहे,” असेही खडसे (Eknath khadse on bjp mns alliance) म्हणाले.

“अलीकडंचं राजकारण असं झालं आहे की, कोण काय करेल? कोण कोणसोबत जाईल? कोणाला साथ देईल? यावर माझा विश्वासच राहिलेला नाही. वेगवेगळ्या विचारांचे माणसं एकत्र येतात. तत्त्व आणि विचार सोडून पक्ष एकत्र येतात, त्यामुळे राजकारणात काय घडेल, हे आता सांगता येत नाही,” असा टोलाही एकनाथ खडसे यांनी लगावला.

“ज्या प्रकारे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाले. शिवसेनेने काही प्रमाणात आपली तत्त्व सोडली काही धोरण बाजूला ठेवली. तसं हिंदुत्वाचा मुद्दा आहे, त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेना अडचणीत येऊ शकते किंवा आली. तर दुसरीकडे, काही विषय जे शिवसेनेला काँग्रेसचे मान्य झाले नाहीत. असे विषय बाजूला ठेवून युती केली. त्यामुळे हिंदू विचारसरणीचा काही खास मतदार होता, तो काही प्रमाणात दुखावला. अशा मतदारांना भाजपमध्ये आणण्याची संधी निर्माण झाली आहे,” असा सल्लाही एकनाथ खडसेंनी भाजपला दिला.

मनसेच्या शॅडो कॅबिनेट संकल्पनेचेही एकनाथ खडसेंनी कौतुक केले. “शॅडो कॅबिनेट ही संकल्पना चांगली आहे. पण ती राबवली गेली पाहिजे. ब्रिटेनमध्ये शॅडो कॅबिनेट ही संकल्पना उत्तमरित्या राबवली जाते. त्याची नोंद ते संवेदनशील सरकार अशी घेतात. जर शॅडो कॅबिनेट झालं आणि सरकारचं संवेदनशील नसेल तर त्याला काहीही अर्थ नाही.”

“सरकारवर बारकाईने निरीक्षण ठेवणं. ते योग्य रित्या आणि नियमानुसार काम करतात की नाही हे यासाठी जबाबदारीने आपली भूमिका पार पाडणं असे अनेक विषय शॅडो कॅबिनेटच्या माध्यमातून पार पाडता येतात. ही संकल्पना चांगली आहे,” असेही खडसे म्हणाले

“राज्यसरकार ज्याचे सरकार असेल त्याचे फोटो सर्वप्रथम लावतं. केंद्रीय पातळीवर केंद्राच्या नेत्यांचे फोटो असतात. तो आजपर्यंतच्या धोरणाचा विषय आहे. पंतप्रधान हे देशाचे नेते आहे. ते पक्षाचे नेते म्हणून काम करत नाही. मात्र मोदींचा फोटो आवश्यक आहे जर ते होत नसेल तर त्यावर सुधारणा करावी,” असेही एकनाथ खडसे (Eknath khadse on bjp mns alliance) म्हणाले.