Pune Mns | शर्मिला ठाकरेंचे शब्द वसंत मोरेंनी खूपच मनावर घेतले का? आता दुसऱ्या स्टेटसमध्ये म्हटलय….

Pune Mns | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी अलीकडेच एक वक्तव्य केलं. त्यामुळे वसंत मोरे यांची अस्वस्थतात वाढल्याचा दिसत आहे. ते त्यांच्या व्हॉट्स एप स्टेटसमधून दिसू लागलय.

Pune Mns | शर्मिला ठाकरेंचे शब्द वसंत मोरेंनी खूपच मनावर घेतले का? आता दुसऱ्या स्टेटसमध्ये म्हटलय....
vasant more and sharmila thackeray
| Updated on: Feb 08, 2024 | 8:43 AM

पुणे (प्रदीप कापसे) : पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अंतर्गत स्पर्धा आहे. त्यातून पुन्हा एकदा आपसात मतभेद आणि धुसफूस वाढत चालल्याच पहायला मिळतय. लोकसभा निवडणूक आता जवळ आली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पुढच्या दोन महिन्यात देशातील राजकारण ढवळून निघणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष, नेते कामाला लागले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आधीपासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पुण्यात मनसेच तिकीट मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा आहे. वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोघेही पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी अलीकडेच एक वक्तव्य केलं. त्यामुळे वसंत मोरे यांची अस्वस्थतात वाढल्याचा दिसत आहे. ते त्यांच्या व्हॉट्स एप स्टेटसमधून दिसू लागलय.

मागे काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांना दिल्लीत पाहायचं असल्याचं म्हणत शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं होतं. मात्र आता शर्मिला ठाकरे यांनीच साईनाथ बाबर यांच्या कार्यक्रमामध्ये साईनाथ दिल्लीला गेला तर दुधात साखर पडेल असं म्हटलं. हे वक्तव्य वसंत मोरे यांनी खूपच मनावर घेतल्याच दिसतय. कारण “कुणासाठी कितीबी करा राव, पण वेळ आली की फणा काढतातच पण मी बी पक्का गारुडी आहे. योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार, असं वसंत मोरे यांनी आपल्या व्हाट्सअॅप स्टेटमध्ये लिहिलं” त्यामुळे वसंत मोरे यांचा रोख नेमका कोणावर आहे? त्यांनी कोणाला इशारा दिला? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.

राज ठाकरेंना करावी लागलेली मध्यस्थी

आता पुन्हा एकदा वसंत मोरे यांच्या स्टेटसची चर्चा आहे. ‘आता सगळेच म्हणू लागलेत, पुणे की पसंत मोरे वसंत !’ असं स्टेटस त्यांनी ठेवलय. या स्टेटसमधून त्यांनी मनसेकडून तिकीट मिळण्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेतच. मध्यंतरी वसंत मोरे मनसे सोडणार अशी चर्चा रंगली होती. स्वत: राज ठाकरे यांनी शीवतीर्थवर वसंत मोरे यांना बोलवलं होतं. त्यांचं म्हणण ऐकून घेतलं व मध्यस्थी केली होती.