AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : अक्षर पटेलला प्लेइंग 11 बाहेर राहण्यास कोणी भाग पाडलं? लज्जास्पद पराभवानंतर बॅटिंग कोचचा शॉकिंग खुलासा

T20 World Cup 2026 : टीम इंडियासाठी टी20 वर्ल्ड कपमधील पुढील दोन्ही सामने 'करो या मरो' बनले आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवाची काही कारणं आहेत. त्यात अक्षर पटेलला प्लेइंग 11 बाहेर ठेवणं हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. आता अक्षरला बाहेर रहायला कोणी भाग पाडलं? त्याबद्दल शॉकिंग खुलासा झाला आहे.

T20 World Cup 2026 : अक्षर पटेलला प्लेइंग 11 बाहेर राहण्यास कोणी भाग पाडलं? लज्जास्पद पराभवानंतर बॅटिंग कोचचा शॉकिंग खुलासा
Team India Image Credit source: PTI
| Updated on: Feb 25, 2026 | 8:32 AM
Share

टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 च्या सामन्यात टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेने दारुण पराभव केला. या पराभवामुळे टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग कठीण बनलाय. फलंदाजांची खराब कामगिरी आणि अक्षर पटेलला प्लेइंग 11 बाहेर ठेवण्याचा निर्णय ही अहमदाबादमधील पराभवाची मुख्य कारणं आहेत. अक्षरच्या जागी प्लेइंग 11 मध्ये वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करण्यात आला होता. अक्षर पटेल टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. त्याला बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर अनेक क्रिकेट पंडितांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सोशल मीडियावरही अनेकांनी कमेंट्स करुन या निर्णयाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली.

अक्षर पटेलला प्लेइंग 11 बाहेर का ठेवलं?. या प्लानिंगमागचं कारण आता समोर आलय. भारताचे बॅटिंग कोच सितांशु कोटक या निर्णयाबद्दल बोलले आहेत. अक्षर पटेलला बाहेर का ठेवलं? त्यामागचं कारण त्यांनी सांगितलं. कोटक यांच्यानुसार कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि मुख्य कोच गौतम गंभीर यांनी मॅच आधी अक्षर पटेलसोबत दीर्घ चर्चा केली व त्याला प्लेइंग बाहेर का ठेवलं जातय? त्यामागची कारणं सांगितली. अक्षर पटेल टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. त्यामुळे या निर्णयावर प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे.

सितांशु कोटक काय म्हणाले?

सूर्या आणि गौतम दोघे त्याच्याशी बोलले असं कोटक यांनी सांगितलं. प्रतिस्पर्धी टीमच्या टॉप ऑर्डरमध्ये तीन डावखुरे फलंदाज होते. त्यामुळे एका ऑफ स्पिनरची गरज होती. आम्ही सुरुवातीचे विकेटही काढले. वॉशिंग्टनने पावरप्लेमध्ये गोलंदाजी केली नाही. खरंतर त्याने पावरप्लेमध्ये गोलंदाजी करणं अपेक्षित होतं. दक्षिण आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरमध्ये तीन डावखुरे फलंदाज होते. ती बाब ध्यानात घेऊन टीम मॅनेजमेंटने ऑफ स्पिनरला प्राधान्य दिलं असं कोटक यांनी सांगितलं. पण प्रत्यक्ष मॅचमध्ये गोलंदाजीच्या योजनेत बदल झाले.

पुढचे दोन्ही सामने करो या मरो

सुपर-8 राऊंडमधील एका पराभवामुळे टीम इंडियासाठी पुढचे दोन्ही सामने करो या मरो बनले आहेत. कोटक यांच्या मते खेळाडूंना असा दबाव झेलण्याची सवय आहे. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्ध मोठा विजय मिळवून सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...