AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasant More Video : बाप्पाच्या मिरवणुकीत जेव्हा ‘तात्या’ बाण सोडतात! वसंत मोरेंचा हा डान्स पाहिला का?

अभिनेत्री अमृता खानविलकर हीच्या चंद्रमुखी सिनेमातील प्रसिद्ध चंद्रमुखी या गाण्यावरच वसंत मोरे यांना ठेवा धरला होता. मिरवणुकीत ट्रॅक्टरवर चढलेल्या वसंत मोरे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात गाजतोय. अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओवर दिलखुलास प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Vasant More Video : बाप्पाच्या मिरवणुकीत जेव्हा 'तात्या' बाण सोडतात! वसंत मोरेंचा हा डान्स पाहिला का?
वसंत मोरे चंद्रमुखी गाण्यावर नाचताना..Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Sep 10, 2022 | 1:02 PM
Share

पुणे : पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) हे वेगवेगळ्या कारणांमुळे या वर्षी चर्चेत राहिले. आता त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत त्यांनी जबरा ठुमके लगावले आहेत. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन वसंत मोरे यांनी हा व्हिडीओ (Vasant More Dance Video) शेअर केला आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर हीच्या चंद्रमुखी सिनेमातील प्रसिद्ध चंद्रा (Chandra Song From Chandramukhi Movie) या गाण्यावरच वसंत मोरे यांना ठेका धरला होता. मिरवणुकीत ट्रॅक्टरवर चढलेल्या वसंत मोरे यांचा नाचतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियात गाजतोय. अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओवर दिलखुलास प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शुक्रवारी वसंत मोरे यांनी हा व्हिडीओ आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला. या व्हिडीओमध्ये लावणी नृत्यात बाण मारतात, त्याप्रमाणे वसंत मोरे यांनी दिलखेचक अदा देत नृत्य केलंय. ट्रॅक्टरवर लावण्यात आलेल्या डीजेवर गणपती मिरवणुकीचा आनंद वसंत मोरे यांनी घेतला. यावेळी त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे मनमुराद डान्स केला.

पाहा व्हिडीओ :

कोरोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या थाटामाटत होत असलेल्या गणपती विसर्जनाचा शुक्रवारी उत्साह पाहायला मिळाला. दोन वर्षांनी कोणत्याही बंधनाविना गणेशभक्तांनी विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेतला. यावेळी मिरवणुकीत डीजे, ढोल, यांच्या तालावर गुलालाची उधळण करत गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं होतं.

पुण्यातही गणपती मिरवणुकीचा आनंद आणि उत्साह यावेळी पाहायला मिळाला. यात पुण्याचे मनसे नगरसेवक आणि नेते वसंत मोरे यांच्या डान्सची सोशल मीडियात आता चर्चा रंगली आहे. ‘बाण नजरेतला घेऊनी अवतरली सुंदरा…’ असं कॅप्शन देत वसंत मोरे यांनी गणपती मिरवणुकीतला व्हिडीओ फेसबुकवरुन शेअर केला आहे. आतापर्यंत 18 हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाईक केलाय. तर अनेकांनी हा व्हिडीओ शेअरही केलाय. डीजेच्या तालावर केलेला वसंत मोरे यांचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

वसंत मोरे हे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. या वर्षाच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदींवरील भोंग्याच्या भूमिकेमुळे वसंत मोरे चर्चेत आले होते. त्यानंतर राजकारणही गाजलं होतं. पण पुण्यात मनसेच्या अंतर्गत गटबाजीचं राजकारणही मधल्या काळात गाजलं होतं. तेव्हादेखील वसंत मोरे हे चर्चेत होते. वसंत मोरे मनसे सोडणार, अशी कुजबूजही सुरु होती. पण आपण कायम मनसैनिक राहणार असल्याचं वसंत मोरे यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.