गाडीचा नंबर, पहिली सभा ते मनसेचा महामोर्चा, राज ठाकरेंचं 9 नंबर कनेक्शन

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Feb 09, 2020 | 2:20 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (9 फेब्रुवारी) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात (Raj Thackeray lucky number) आलं आहे. या मोर्चाचे विशेष म्हणजे आजची तारीख आहे.

गाडीचा नंबर, पहिली सभा ते मनसेचा महामोर्चा, राज ठाकरेंचं 9 नंबर कनेक्शन
Follow us

मंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (9 फेब्रुवारी) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात (Raj Thackeray lucky number) आलं आहे. या मोर्चाचे विशेष म्हणजे आजची तारीख आहे. राज ठाकरे यांचा लकी नंबर 9 मानला जातो. तसेच आजची तारीखही 9 आहे त्यामुळे राज ठाकरेंनी आपल्या लकी नंबरच्या दिवशी मोर्चा आयोजित केला असल्याची (Raj Thackeray lucky number) चर्चा सुरु आहे.

राज ठाकरे आपली सर्व महत्त्वाची कामं आपल्या लकी नंबरनुसार करतात, असं म्हटलं जाते. त्यानुसार आतापर्यंत अनेक कामं राज ठाकरेंनी 9 नंबरनुसार केले. राज ठकारे आज 9 नंबरच्या गाडीत बसूनच ते मोर्चासाठी रवाना झाले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 9 नंबरला ‘लकी’ मानतात. पूर्वी शिवसेनेत असताना असो किंवा मग मनसेची स्थापना केल्यानंतर असो, राज ठाकरेंचं हे ‘9’ अंकावरील प्रेम वारंवार दिसत राहिलं आहे. आपल्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं देखील राज ठाकरेंनी आपला लकी नंबर जपण्याचा पूरेपूर प्रयत्न केला.

नुकतेच विधानसभा निवडणुकीतही राज ठाकरेंनी आपल्या प्रचाराची सुरुवात 9 तारखेपासून केली होती. पहिल्या सभेसाठी मुहूर्त मनसेने आपला लकी नंबर 9 निवडला होता. राज ठाकरे हे 9 हा अंक लकी मानतात. त्यामुळे मनसेचे महत्त्वाचे निर्णय, शुभारंभ हा 9 या नंबरभोवती फिरताना दिसतो.

राज ठाकरेंनी आपल्या पक्षाची भूमिका बदल्यानंतर त्यांनी हिंदुत्वाकडे वाटचाल केली आहे. पक्षाची भूमिका बदलल्यांतर राज यांनी पहिला मोर्चा आज म्हणजे 9 फेब्रुवारी रोजी आयोजित केला.

राज ठाकरेंचा लकी नंबर 9

  • 27 (2+7) नोव्हेंबर 2005 : शिवसेना सोडण्याची घोषणा
  • 18 (1+8) डिसेंबर 2005 : शिवसेना सोडली
  • 9 मार्च 2006 : महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या स्थापनेची घोषणा
  • 18 (1+8) मार्च 2006 : शिवतीर्थावरील पहिली सभा

गाड्यांचे नंबर, मुलाच्या लग्नाचा मुहूर्त

राज ठाकरे यांच्या सर्व गाड्यांचा नंबर 9 आहे. इतकंच काय त्यांचा मुलगा अमितच्या लग्नाचा मुहूर्तही 27 जानेवारी (2+7) दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी (1+2+5+1 = 9) होता.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI