मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा, टिझर पाहिलात का?

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज...

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा, टिझर पाहिलात का?
| Updated on: Nov 27, 2022 | 11:56 AM

मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक (Mumbai Mahapaika Election 2022) अवघ्या आलीय.अशात सगळेच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत. मनसेनेदेखील मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केलीय. आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत मनसेचा मेळावा होतोय. यात आगामी पालिका निवडणुकीची रणनिती ठरवली जाणार आहे.

मुंबईतील गोरोगावच्या नेस्को मैदानात मनसेचा कार्यकर्ता मेळावा होतोय. दुपारी चार वाजता या मेळाव्याला सुरुलात होईल. यात राज ठाकरे मनसेच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज फोडला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

या पदाधिकारी मेळाव्याचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. “चला हे चित्र बदलूया… आपण महाराष्ट्राला पर्याय देऊया…, चला नव्याने स्वप्न पाहूया… महाराष्ट्र घडवूया…” , असं या टीझरमध्ये म्हणण्यात आलं आहे. या टीझरला “महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी घसरली आहे असं वाटतं ना? चला तर मग ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ पर्याय द्यायला तयार आहे…!”, असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता मिशन पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला नवी उभारी देण्यासाठी सज्ज झालीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी कोल्हापुर दौऱ्यावर जाणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. राज ठाकरे यांच्या या दौरामुळे मनसेला नवी उभारी मिळणार का हे पाहणं महत्वाचं असेल.