‘अरे बघताय काय सामील व्हा’; राज ठाकरेंच्या मनसेत ‘महाभरती’ला सुरुवात

| Updated on: Mar 14, 2021 | 8:31 AM

मनसेने 15 वर्षाच्या राजकीय वाटचालीत सदस्य नोंदणी करण्यासाठी पहिल्यांदाच वृत्तपत्रात जाहिरात दिली आहे. आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये मुखपृष्ठावर मनसेच्या सदस्य नोंदणीची आज जाहिरात आहे. | MNS Raj thackeray

अरे बघताय काय सामील व्हा; राज ठाकरेंच्या मनसेत महाभरतीला सुरुवात
Raj Thackeray
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची जोरदार तयारी सुरु केली आहे. मनसेने 15 वर्षाच्या राजकीय वाटचालीत सदस्य नोंदणी करण्यासाठी पहिल्यांदाच वृत्तपत्रात जाहिरात दिली आहे. आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये मुखपृष्ठावर मनसेच्या सदस्य नोंदणीची आज जाहिरात आहे. अरे बघताय काय सामिल व्हा, असं म्हणत मनसेने तमाम मराठीजनांना साद घातली आहे. (MNS Raj thackeray Member registration Started)

पुणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोबिंवली तसंच मिरा भाईंदर महापालिका निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. याच महानगरपालिकासांठी खुद्द राज ठाकरे यांनी पुढे सरसावत गेल्या अनेक दिवसांपासून विभागवार मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला आहे.

आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये मुखपृष्ठावर मनसेच्या सदस्य नोंदणीची जाहिरात

मनसेने 15 वर्षाच्या राजकीय वाटचालीत सदस्य नोंदणी करण्यासाठी पहिल्यांदा वृत्तपत्रात जाहिरात दिली आहे. आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये मुखपृष्ठावर मनसेच्या सदस्य नोंदणीची आज जाहिरात आहे.

सदस्य होण्यासाठी तीन पर्याय

आजपासून ही सदस्य नोंदणी सुरू झाली आहे. सदस्य होण्यासाठी तीन पर्याय देण्यात आले आहेत. मोबाईल वर स्कॅन करून, संकेत स्थळावर जाऊन किंवा जाहिरातीत दिलेल्या मोबाईल नंबरवर मिस्ड कॉल देऊन नागरिकांना मनसेचे सदस्य होता येणार आहे.

आज सकाळी 10 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी स्वतःची सदस्य नोंदणी करणार आहेत. मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर सदस्य नोंदणी साठी वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीचा मजकूर काल रात्री व्हॉटस् अप करण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त सदस्य नोंदणीचे मनसेचे लक्ष्य आहे.

मनसेच्या जाहिरातीमुळे शिवसेना स्थापनेच्या आठवणींना उजाळा

मनसेच्या जाहिरातीमुळे शिवसेना स्थापनेच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापनेवेळी व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’मध्ये जाहिरात देऊन मराठी भाषिकांना शिवसेनेचे सदस्य होण्यासाठी साद घातली होती.

(MNS Raj thackeray Member registration Started)

हे ही वाचा :

राज ठाकरेंचं मिशन महानगरपालिका, पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी, बैठका आणि बरंच काही!