Amit Thackeray’s Birthday | अमित ठाकरेंसाठी मनसे प्रवक्ते गजानन काळेंनी खास केक आणला
आज राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा वाढदिवस आहे.भोंग्यांचे चित्र आणि भोंगा बंद झालाच पाहिजे असा संदेश लिहलेला केक कापण्यात आल्याने सर्वत्र केकचीच चर्चा होत आहे. आनाधिकृत भोंग्याविरोधात मनसेचे आंदोलन सुरु राहील अशाप्रकारचा प्रतिकात्मक संदेश या केकच्या माध्यमातून देण्यात आला.
आज राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अमित ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी शिवतिर्थाबाहेर गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे. अमित ठाकरेंनी वाढदिवसानिमित्त खास भोंगा असलेला केस कापला. असा हा अनोखा भोंग्याबाबत संदेश देणार केक मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी आणला होता. तसंच दुसरा केक हा फुटबॉल असलेला कापला. पण, सर्वत्र चर्चा मात्र भोंग्याबाबत संदेश देणाऱ्या केकचीच झाली. तसंच अमित ठाकरे यांना कर्याकर्त्यांच्या वतीने लेझर शोद्वारे देखील शुभेच्छा देण्यात आल्या. भोंग्यांचे चित्र आणि भोंगा बंद झालाच पाहिजे असा संदेश लिहलेला केक कापण्यात आल्याने सर्वत्र केकचीच चर्चा होत आहे. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी हा केक आणला होता. आनाधिकृत भोंग्याविरोधात मनसेचे आंदोलन सुरु राहील अशाप्रकारचा प्रतिकात्मक संदेश या केकच्या माध्यमातून देण्यात आला.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर

