दोन-तीन महिन्यात पुन्हा पुलवामासारखा हल्ला: राज ठाकरे

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 13 व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. राफेल ते पुलवामासह सर्व मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. यावेळी राज ठाकरेंनी निवडणुकांच्या तोंडावर येत्या दोन तीन महिन्यात पुलवामासारखा हल्ला घडवून आणला जाईल, असा संशय व्यक्त केला. शिवाय सुरक्षा यंत्रणांनी हल्ल्यापूर्वी संकेत दिले […]

दोन-तीन महिन्यात पुन्हा पुलवामासारखा हल्ला: राज ठाकरे
Follow us on

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 13 व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. राफेल ते पुलवामासह सर्व मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. यावेळी राज ठाकरेंनी निवडणुकांच्या तोंडावर येत्या दोन तीन महिन्यात पुलवामासारखा हल्ला घडवून आणला जाईल, असा संशय व्यक्त केला. शिवाय सुरक्षा यंत्रणांनी हल्ल्यापूर्वी संकेत दिले असूनही पुलवामा हल्ला कसा झाला? भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल काय करत होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मात्र यावेळी राज ठाकरे यांनी महाआघाडीत जाणार की नाही या सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही. लोकसभा निवडणुकीचा निर्णय जो सांगेन, तो तुमच्या, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताचा असेल, आचारसंहिता लागली की आपण भेटूच, असं राज ठाकरे म्हणाले.

अजित डोभालांच्या चौकशीत गैर काय?

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावर सडकून टीका केली. अजित डोभालांची चौकशी केली पाहिजे या मागणीत अयोग्य काय? अजित डोभालांच्या मुलाच्या कंपनीत एक पार्टनर अरब आणि दुसरा पाकिस्तानी आहे.  पुलवामा हल्ला हा गुप्तचर यंत्रणेचं अपयश नाही, सीआरपीएफच्या जवानांना एअरलिफ्ट करण्यास आधीच सांगितलं होतं, मग हा हल्ला कसा झाला? भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल काय करत होते असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

डोवाल आणि पाकिस्तानी सुरक्षा सल्लागारांची भेट

14 फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्यापूर्वी 27 डिसेंबरला अजित डोवाल आणि पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार यांची बँकॉकमध्ये भेट झाली होती. ही भेट का झाली? आम्ही प्रश्न विचारायचा नाही का? त्या बैठका कशासाठी झाल्या याचं उत्तर द्यावं असं राज म्हणाले.

…तर त्याला  उभा जाळला असता

भाजपवाले खोटं बोलतायेत कारण यांना निवडणूक जिंकायची आहे. एअर स्ट्राईकबाबत हे सांगतात, एक इमारत आहे कौलासकट. निळी कौलं आहेत. तो फोटो दिलाय बिफोर आणि त्या इमारतीचं काम सुरुय तो दिलाय आफ्टर. किती खोटा प्रचार करायचा हे भाजपला कळायलं हवं.

साधी गोष्ट लक्षात घ्या 200, 300 सोडून द्या, साधी दहा माणसं जरी मारली असती ना तर अभिनंदन आमचा परत आलाच नसता. इम्रान खान निर्णयच घेऊ शकत नाही. त्या देशाने उभा जाळला असता त्याला. आपली माणसं इतकी मारली असती तर आपण वैमानिकाला सोडलं असतं का? त्यांची 200-300 माणसं मारली असती तर आपला वैमानिक परत देतील का? हे खोटं बोलतायेत कारण यांना निवडणूक जिंकायची आहे, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला.

राफेल विमानावर नाही, भ्रष्टाचारावर बोट

मोदी म्हणतात राफेल विमान असतं तर निकाल अजून वेगळा लागला असता, पण आमचा आक्षेप राफेल विमानाच्या कुवतीला नाही तर त्यातील भ्रष्टाचाराला आहे. अनिल अंबानींना कंत्राट का दिलं हा प्रश्न आहे. राफेलची कागदपत्र चोरीला जातात, जुन्या चित्रपटात दाखवत होते ते खोटं वाटायचं, पण असली प्रकरणं बघता ते खरंच वाटायला लागलं, असा टोला राज यांनी लगावला.

काँग्रेस काळातील बोफोर्स तोफांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजला, पण कारगिलमध्ये त्याच तोफांची जास्त मदत झाली, प्रश्न बोफोर्स तोफा किंवा राफेल विमानांच्या ताकदीचा नाही, भ्रष्टाचाराचा आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

LIVE UPDATE

मोदी म्हणतात जवानांपेक्षा व्यापाऱ्यांचं शौर्य जास्त, मग व्यापाऱ्यांना सीमेवर पाठवा – राज ठाकरे लाईव्ह

पुढच्या महिना-दोन महिन्यात पुलवामासारखा हल्ला घडवला जाईल, लक्ष तिकडे वळवून राष्ट्रभक्ती सुरु होईल –

राफेलची कागदपत्र चोरीला जातात, जुन्या चित्रपटात दाखवत होते ते खोटं वाटायचं, पण असली प्रकरणं बघता ते खरंच वाटायला लागलं

राम आणि हिंदू अंगावर आला, द हिंदू वर्तमानपत्राचा दाखला देत राज ठाकरेंचा मोदींवर हल्ला  – राज ठाकरे लाईव्ह

पुलवामा हल्ल्यानंतर मोदींचे 15 दिवसांचे फोटो पाहिले, तेव्हा प्रश्न पडला हा कसला फकीर? – राज ठाकरे लाईव्ह

एअर स्ट्राईकनंतर 250 दहशतवादी ठार झाल्याचं अमित शाह म्हणाले, ते मोजायला अमित शाह को पायलट होते का

कोणत्याही सैन्याला टार्गेट दिल्यानंतर ते त्यांचं काम पूर्ण करुन येतात, कोणतंही सैन्य युद्ध जिंकतं किंवा हरते ते योग्य/अयोग्य माहितीमुळे

आमच्या सैन्याने बॉम्ब फेकले त्याचा आम्हाला अभिमान आहेच, पण त्याची माहिती चुकीची दिली जात आहे – राज ठाकरे लाईव्ह

पाच-10 माणसं जरी मारली असती तर वैमानिक अभिनंदन परत आला नसता, उभा जाळला असता त्याला, आपली माणसं इतकी मारली असती तर आपण वैमानिकाला सोडलं असतं का? हे खोटं बोलतायेत कारण यांना निवडणूक जिंकायची आहे –

तुमच्या भ्रष्टाचारासाठी राफेलचा मुद्दा काढताय, ती विमानं असतील चांगली पण आमचा प्रश्न आहे की अनिल अंबानीला काम का दिलं? – राज ठाकरे लाईव्ह

बोफोर्स तोफांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजला, पण कारगिलमध्ये त्याच तोफांची जास्त मदत झाली, प्रश्न बोफोर्स तोफा किंवा राफेल विमानांच्या ताकदीचा नाही, भ्रष्टाचाराचा आहे – राज ठाकरे लाईव्ह

आधी सांगूनही पुलवामा हल्ला झाला, मग राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार करतोय काय?

पुलवामा हल्ला हा गुप्तचर यंत्रणेचं अपयश नाही, सीआरपीएफच्या जवानांना एअरलिफ्ट करण्यास आधीच सांगितलं होतं, मग हा हल्ला कसा झाला?

दाऊदला भारतात आणण्याचे प्रयत्न दाखवतायेत, पण दाऊदला स्वत:लाच यायचं आहे, हे सुद्धा मी आधीच सांगितलं आहे

–  मी 2015 मध्ये कल्याण डोंबिवलीत बोललो होतो, मोदी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील

14 फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्यापूर्वी 27 डिसेंबरला अजित डोवाल आणि पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार यांची बँकॉकमध्ये भेट झाली होती. ही भेट का झाली?

भाजप किंवा नरेंद्र मोदींचे लोक तुम्हा आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणार का? हे राष्ट्रभक्त असते तर मोदी नवाज शरीफला केक भरवायला गेले नसते

*********************

VIDEO राज ठाकरे यांचं कोल्हापुरातील संपूर्ण भाषण


संबंधित बातम्या

पाकिस्तानचं पाणी अडवायला नदीत अमित शाह झोपणार का? : राज ठाकरे