मुंबई 36 पैकी 36, ठाणे 24 पैकी 24, नाशिक 15 पैकी 15, मनसेची 122 जागांची तयारी

सचिन पाटील

Updated on: Sep 23, 2019 | 6:31 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक (MNS Vidhansabha election) लढणार की नाही याबाबतची चर्चा सुरु असताना, आता मनसेने  (MNS Vidhansabha election)थेट उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे.

मुंबई 36 पैकी 36, ठाणे 24 पैकी 24, नाशिक 15 पैकी 15, मनसेची 122 जागांची तयारी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक (MNS Vidhansabha election) लढणार की नाही याबाबतची चर्चा सुरु असताना, आता मनसेने  (MNS Vidhansabha election)थेट उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. मनसेने 100 पेक्षा जास्त उमेदवारांची तयारी जाणून घेतली. इतकंच नाही तर मुंबई, ठाणे, नाशिकमधील सर्व जागा मनसे लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.

सध्या मनसेची एकूण 122 जागांची तयारी झाली आहे. त्यामध्ये मुंबईतील 36 पैकी 36 जागा, ठाणे 24 पैकी 24, नाशिक 15 पैकी 15, मराठवाडा 42 पैकी 22, विदर्भ 62 पैकी 15, कोकण 15 पैकी 10, उत्तर महाराष्ट्र – चाचपणी सुरु, अशी मनसेने तयारी केली आहे.

शिवसेना-भाजपची युती झाल्यास नाराज पदाधिकारी मनसेकडे वळतील, अशी आशा पक्षाला आहे. युती होईल असं गृहीत धरुन मनसे नाराजांना संपर्क करत आहे. भाजपा आणि सेनेचे काही पदाधिकारी मनसेच्या वाटेवर असल्याचा दावा मनसेचा आहे.

मनसेची बैठक

दोनच दिवसापूर्वी मनसेची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोअर कमिटीची बैठक मनसेच्या दादर इथल्या राजगड कार्यालयात पार पडली. या कोअर कमिटीत मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, नितीन सरदेसाई आणि अमित ठाकरे हे मनसेच्या पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष आणि विभाग प्रमुखांकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत होते. या बैठकीत मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेण्यात आल्याचं मनसेच्या नेत्यांनी सांगितलं आहे.

“मनसे आघाडीसोबत जाणार नाही”

विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मनसे जाईल, अशी चर्चा होती. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा प्रचाराचा जो झंझावात होता, तो झंझावात आता राज ठाकरे स्वतःच्या पक्षासाठी करताना विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या 

अखेर मनसेच्या निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब, जागाही ठरल्या  

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI