MNS vs Shivsena : आम्ही पक्ष कुणाच्या दाढीला बांधलेला नाही, मनसे आमदाराचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

शिवसेना आणि मनसे या दोन्ही प्रादेशिक पक्षातील नेत्यांमध्ये अनेकदा आरोप-प्रत्यारोप, टीका टिप्पणी आणि कोणत्याही मुद्द्यावरुन होणारी बॅनरबाजी अवघ्या महाराष्ट्राने पाहिलंय. यातच हनुमान चालीसा मशिदीसमोर भोंग्यावरुन वाजवण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या फर्मानावरुन या दोन्ही प्रादेशिक पक्षांमध्ये पुन्हा एकदा वार-पलटवार सुरु झाले आहेत. यातच मनसेचे नेते आणि आमदार राजू पाटील यांनी तेथ कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेंवर पलटवार केलाय.

MNS vs Shivsena : आम्ही पक्ष कुणाच्या दाढीला बांधलेला नाही, मनसे आमदाराचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
केडीएमसीमधील 27 गावांत सुविधा नाही तर कर नाही
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 11, 2022 | 5:46 PM

मुंबई : शिवसेना आणि मनसे (MNS vs Shivsena) या दोन्ही प्रादेशिक पक्षांतील नेत्यांमध्ये अनेकदा आरोप-प्रत्यारोप, टीका टिप्पणी आणि कोणत्याही मुद्द्यावरुन होणारी बॅनरबाजी अवघ्या महाराष्ट्राने पाहिलीय. मात्र, आता हनुमान चालीसा मशिदीसमोर भोंग्यावरुन वाजवण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (MNS Cheif raj thackeray)फर्मानावरुन या दोन्ही प्रादेशिक पक्षांमध्ये पुन्हा एकदा वार-पलटवार सुरु झाले आहेत. यातच मनसेचे नेते आणि आमदार राजू पाटील यांनी तेथ कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thacekray) पलटवार केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरुन केलेल्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या निर्णयावर अनेकांनी टीका केली होती. या भाषणावर अनेकांनी चिथावणीखोर भाषण असल्याचा आरोपही केला होता. तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केल्याचा टोला काही पक्षांच्या नेत्यांनी राज ठाकरेंना लगावला होता. यानंतर महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेवर आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी मनसेला थेट टोला लगावला. या टोल्यावर मनसे नेते राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.

राजू पाटील काय म्हणालेत?

मशिदीवरील भोंग्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतलाय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनसमोर भोंगा लावून हनुमान चालीसा ऐकवली. यावर प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, ‘संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही. स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी मनसेला लगावला होता. यानंतर मनसे नेते देखील आदित्य ठाकरेंच्या विरोधात मैदानात उतरल्याचं दिसून आलं. मनसे आमदार राजू पाटील यांनी आम्ही पक्ष जगवण्यासाठी कुणाच्या दाढीला बांधलेला नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांना ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे. त्यामुळे आता भोंगाच्या मुद्द्यावरून शिवसेना मनसेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्याने राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येतंय.

आमदार राजू पाटील यांचं ट्विट

मनसे-शिवसेनेचा वाद पेटण्याची शक्यता

हनुमान चालीसा मशिदीसमोर भोंग्यावरुन वाजवण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या फर्मानावरुन या दोन्ही प्रादेशिक पक्षांमध्ये पुन्हा एकदा वार-पलटवार सुरु झाले आहेत. यातच मनसेचे नेते आणि आमदार राजू पाटील यांनी तेथ कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेंवर पलटवार केलाय. यापूर्वी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरुन केलेल्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या निर्णयावर अनेकांनी टीका केली होती. या निर्णयावर अनेकांनी चिथावणीखोर भाषण असल्याचा आरोपही केला होता. तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केल्याचा आरोप काही पक्षांच्या नेत्यांनी राज ठाकरेंना लगावला होता. त्यामुळे पुन्हा शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमधील वार-पलटवार आणखी वाढण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

BMW यंदा भारतात 19 कार आणि पाच बाईक लाँच करणार, विक्रीत 25% वाढ

‘बँक ऑफ बडोदा’च्या ग्राहकांना झटका; वैयक्तिक वाहन, गृहकर्ज महागणार!

Phone Tapping : “मी पुन्हा येईन” या नादात माझीच फोन टॅपिंग, खडसेंचा फोन 67 दिवस टॅप केल्याचा आरोप