‘बँक ऑफ बडोदा’च्या ग्राहकांना झटका; वैयक्तिक, वाहन, गृहकर्ज महागणार!

सार्वजनिक क्षेत्रातील ‘बँक ऑफ बडोदा’च्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बँकेने सोमवारी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ट लेंडिंग रेट्स (MCLR) वाढवले आहेत. बँकेने 12 एप्रिल 2022पासून MCLRमध्ये 0.05 टक्के वाढ केली असून, या अंतर्गत एक वर्षाच्या कालावधीसाठी एमएलसीआर 7.35 टक्के वाढेल.

‘बँक ऑफ बडोदा’च्या ग्राहकांना झटका; वैयक्तिक, वाहन, गृहकर्ज महागणार!
बँक ऑफ बडोदा Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 4:44 PM

बँक ऑफ बडोदा’तर्फे या महिन्यापासून, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ट लेंडिंग रेट्स (MCLR)मध्ये 0.05 टक्के वाढ करण्यात आली असून, याचा थेट परिणाम (Direct results) ग्राहकांवर होणार आहे. बँकांद्वारे MCLRमध्ये कोणतीही वाढ किंवा कपात (Increase or decrease) नवीन आणि विद्यमान कर्जदारांवरदेखील परिणाम करते. याअंतर्गत, एक वर्षाच्या कालावधीसाठी एमएलसीआर 7.35 टक्के वाढेल. वैयक्तिक वाहन, गृहकर्ज यासारखी बहुतांश ग्राहक कर्जे (Consumer loans) एका वर्षाच्या MCLRवर आधारित असतात. बँकेने शेअर बाजाराला सांगितले, की त्यांनी MCLRच्या पुनरावलोकनास मान्यता दिली आहे, जो 12 एप्रिल 2022पासून लागू होईल. एप्रिल 2016नंतर बँकांनी MCLRमध्ये केलेली कोणतीही वाढ किंवा कपात नवीन आणि विद्यमान कर्जदारांना देखील प्रभावित करते. MCLR 1 एप्रिल 2016पासून बँकिंग प्रणालीमध्ये लागू करण्यात आली. हा कर्जाचा किमान दर मानला जातो.

वैयक्तिक वाहन, गृहकर्ज महागणार

मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ट लेंडिंग रेट्स वाढविल्याने, वैयक्तिक, वाहन, गृहकर्ज महागणार आहे. त्याचप्रमाणे, एक रात्र, एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांचा MCLR 0.05 टक्क्यांनी वाढवून 6.50 टक्के, 6.95 टक्के, 7.10 होईल. एक वर्षाच्या MCLRमधील वाढीमुळे वैयक्तिक कर्ज, वाहन आणि गृहकर्ज महाग होऊ शकते. निधीची किरकोळ किंमत, मुदतीचा प्रीमियम ऑपरेटिंग खर्च आणि रोख राखीव प्रमाण राखण्यासाठी लागणारा खर्च यावर आधारित MCLRची गणना केली जाते.

रेपो दरात कोणताही बदल नाही

गेल्या आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने आपल्या पतधोरणात रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र, मध्यवर्ती बँकेने महागाईवर चिंता व्यक्त करत महागाईचे लक्ष्य वाढवले होते. रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले, की भौगोलिक-राजकीय तणावामुळे जगभरातील किंमतीत वाढ झाली आहे. MCLR वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा परिणाम जेव्हा तुम्ही बँकेकडून कर्ज घेता तेव्हा बँकेकडून आकारण्यात येणाऱ्या किमान व्याजदराला बेस रेट म्हणतात. बेस रेटपेक्षा कमी दराने बँक कोणालाही कर्ज देऊ शकत नाही. या बेस रेटच्या जागी आता बँका MCLR वापरत आहेत.

आणखी वाचा :

24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस सुरु राहणार बँक! सुट्टीची चिंता नको, कधीही उरका बँकेची कामं

Sri Lanka झाली आता नेपाळवर आर्थिक अस्थिरतेचे ढग! सायकल ते तांदूळ आयातीवर निर्बंध

महागाईमुळे ‘या’ देशावर आली होती दहा लाखांची नोट छापण्याची वेळ, सध्या परिस्थिती नियंत्रणात

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.